पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

३१

 ज्या चिन्हांची योजना केली, त्या कल्पना आणि ती चिन्हें युरोपियन लोकांस अगदी अपरिचित होती. ख्रिस्ताची आई मेरी हिची युरोपियन लोकांनी काढिलेली चित्रंच आपण उदाहरणार्थ घेऊ. प्रत्येक चिताऱ्याने स्वतःच्या कल्पनेस अनुसरून हे चित्र तयार केल्यामुळे निरनिराळ्या चित्रांवर अनेकविध मनोवृत्तींची छाया दिसून येते. येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या भोजनप्रसंगाचे चित्र पुष्कळांनी काढिलेले मी पाहिले आहे. या चित्रांत ख्रिस्त टेबलाशी बसल्याचे दाखविले आहे. वास्तविक ख्रिस्ताने टेबलाचा उपयोग जेवण्याकरितां केव्हांहि केला नव्हता. कोणत्याहि राष्ट्रांतील लोकांना परकीयांच्या चालीरीतींचें यथार्थ ज्ञान होणे बहुधा अशक्य आहे. ग्रीक, रोमन आणि इतर राष्ट्रांच्या अनुषंगाने ज्यांत अनेक प्रकारची भेसळ झाली आहे अशा जुन्या यहुदी लोकांच्या चाली युरोपियनांस नीटशा समजल्या नाहीत ही आश्चर्याची गोष्ट नाही. अनेक दंतकथा आणि काल्पनिक गोष्टी यांनी वेष्टून गेलेल्या येशूच्या तत्त्वज्ञानाची नीटशी ओळख युरोपियन लोकांस न झाल्यामुळे त्यांनी सध्यांचा आपल्या वणिग्वृत्तीस साजेसा ख्रिस्तिधर्म निर्माण केला यांत आश्चर्य नाही. असो. आतां हे विषयांतर बाजूस ठेवून आपण आपल्या पहिल्या मुद्दयाकडे वळू.

 आत्मा अमर आहे व आपल्याच कृतीनें तो मलिन झाल्यासारखा दिसतो ही गोष्ट सर्व धर्मास कबूल असल्याचे प्रथम सांगितलेच आहे. आतां ईश्वर अथवा परमात्मा ह्मणजे काय, याबद्दल निरनिराळ्या धर्माच्या काय कल्पना आहेत, त्या पाहूं. अगदी जुन्या काळची परमेश्वराबद्दलची कल्पना अत्यंत अस्पष्ट अशी आहे. जुन्या काळच्या राष्ट्रांत सूर्य, पृथ्वी, अग्नि इत्यादि अनेक प्रकारच्या देवता मानिल्या जात असत. अशाच प्रकारच्या अनेक देवता आपआपसांत मोठमोठी युद्धेहि करित असत, असे जुन्या यहुदी दंतकथांवरून दिसून येते. यानंतर बाबिलोनियन आणि यहुदी लोकांचा इलोहिम देव आढळतो. यानंतर अनेक देवतांची कल्पना कमी होत जाऊन त्या जागी एखाद्या देवास अग्रपूजेचा मान मिळू लागला. परंतु हा मुख्य देव प्रत्येक जातीचा निराळा असे. आपलाच देव सर्वात मोठा असें प्रत्येक जातीने ह्मणावें आणि हा मोठेपणा सिद्ध करण्याकरितां कित्येक वेळां या निरनिराळ्या जातींत लढायाहि होत असत. लढाईत ज्या जातीचा जय होई तिचा देव मोठा असे समजण्यांत येई. या सर्व जाती बहुधा रानटी होत्या. परंतु या निरनिराळ्या कल्पनांचा क्षय होत होत त्यांऐवजी अधिक उदार आणि अधिक उच्च अशा कल्पनांचा प्रादुर्भाव होऊ