पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


असतां या निराशामय स्थितीने मलाहि पछाडलें होतें. धर्मात काही तात्पर्य नाही असे मलाहि वाटू लागले होते; परंतु माझें सुदैव ह्मणून बायबल, कुराण आणि बौवौद्धधर्माची पुस्तके यांचा मी अभ्यास केला. त्या वेळी माझ्या हिंदुधर्मात सांगितलेली प्रमुख मूलतत्वेंच इतर धर्मातहि आहेत असे मला आढळून आले. त्या वेळी अनेक प्रकारची विचारपरंपरा माझ्या चित्तांत उभी राहिली. मी विचार करूं लागलों की, जगांत 'सत्य' तरी काय आहे ? प्रथम हे दृश्य जग सत्य आहे काय ? होय. हे सत्य असलेच पाहिजे. कारण, याचा मला प्रत्येक क्षणीं ज्याअर्थी अनुभव येत आहे त्याअर्थी तें खोटें कसें ह्मणावें? आतांच आपण जें संगीत ऐकिलें तें खरें काय ? होय. ते अगदी खरें. कारण तें आपण आपल्या कानांनी स्वतः ऐकले. प्रत्येक मनुष्याला शरीर, डोळे आणि कान इत्यादि बाह्येद्रिये आहेत. या बाह्येद्रियांनी त्यास बाह्य जगाचा अनुभव घेऊन खऱ्याखोटयाची निवड करता येते. ज्याप्रमाणे मनुष्यमात्रास बाह्येद्रियें आहेत त्याचप्रमाणे त्यास अतींद्रियत्वहि आहे. त्याच्या चैतन्याचे स्वरूप काय आहे हे आपणांस आपल्या चर्मचक्षूनी दिसत नाही. या आपल्या चैतन्यास चालन देऊन मनुष्य विचार करूं लागला असतां त्यास एक गोष्ट निःसंशय आढळून येईल. कोणताहि धर्म, मग तो अरण्यांत ऋषींनी सांगितलेला असो, अथवा ख्रिस्ती देशांत सर्व मनुष्यांपुढे सांगितलेला असो, एकाच प्रकारच्या मूलभूत तत्वांवर रचिला आहे अशी त्याची नि:संशय खात्री होईल. यावरून असें सिद्ध होतें की धर्मविचार हा कोणत्याहि काली व कोणत्याहि स्थली असलेल्या मनुष्यमात्राच्या मनाचा नेहमी आढळणारा एक घटक आहे. एका धर्माच्या सत्यतेकरितां अनेक धर्माची सत्यता सिद्ध व्हावी लागते. अनेक ठिकाणी एकच गोष्ट एकाच प्रकारची आहे असे आढळून आले ह्मणजे आपण त्या गोष्टीचे निश्चित स्वरूप अमूक असें ठरवितो. समजा, की मला सहा बोटें असली आणि आपण निरीक्षणार्थ हाती घेतलेल्या माझ्या जातीच्या पंचवीस प्राण्यांस पांचच बोटें आढळली तर मी तेवढ्यापुरता सृष्टिबाह्य प्राणी आहे असें ह्मणणे चुकीचे होणार नाही. तसेंच एकच धर्म खरा आणि बाकीचे खोटे हे ह्मणणेहि खोटेंच आहे. एकच धर्म असणे हे सहा बोटांच्या प्राण्यासारखेच सृष्टिबाह्य आहे असामान्य आहे. याच न्यायाने जगांतील कोणताहि एक धर्म खरा म्हटला तर बाकीचे खरे असलेच पाहिजेत. कांहीं किरकोळ बाबतीत त्यांत फरक आढळेल परंतु प्रमुख तत्वे सर्वांत सारखींच सांगितली आहेत. जर मला पांच बोटे असणे