पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.
४. हिंदुलोकांस धर्मज्ञानाची उणीव नाही.

२० सप्टेंबर १८९३.

 आपल्या वर्तनावर कांही टीका झाली तर ती सहन करण्यास प्रत्येक खऱ्या ख्रिस्तानुयायाने नेहमी तयार असले पाहिजे. मी आज अशा प्रकारची टीका करणार आहे आणि तीबद्दल आपणास कांहीं विषाद वाटणार नाही असे मला वाटते. ख्रिस्ती धर्माचे जे अनुयायी नव्हत अशा लोकांच्या आत्मोद्धारासाठी आपण जगभर उपदेशक पाठवितां त्याऐवजी आपण प्रथम त्यांचे मृत्यूपासून रक्षण करण्याची तजवीज केली तर अधिक बरे होणार नाही काय? हिंदुस्थानांत लहानसा दुष्काळ पडल्याबरोबर हजारों लोक मृत्युमुखीं जातात; आपण ख्रिस्ती ह्मणविणारांनी त्यांस वाचविण्याचा काही प्रयत्न केला आहे काय ? साऱ्या हिंदुस्थानभर ख्रिस्ती देवळे उभारण्याबद्दल आपण फार दक्ष आहां; परंतु हिंदुस्थानाला आज धर्मज्ञानाची गरज आहे असे नाही. क्षुधेनें त्यांचे पोट आणि त्यांची पाठ यांची एकी झाल्यामुळे भाकरीचा एखादा तुकडा मिळेल या आशेने ते टाहो फोडित आहेत. ते भाकरी मागत असतां त्यांच्या पदरांत धोंडा बांधण्यासारखे आपण करित आहां. भुकेने प्राण व्याकूळ होत असतां कोरड्या धर्मज्ञानाने त्यांची भूक भागवू पाहणे ह्मणजे खरोखर त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. हिंदुस्थानांत केवळ पैशासाठी धर्मज्ञानदानाचा जर कोणी उद्योग केला तर लोक खरोखर त्यांस शेणमार करतील. माझ्या बुभुक्षित बांधवांकरितां मी येथे याचना केली, परंतु ख्रिस्ती देशांत ख्रिस्ती लोकांकडून इतर जातीच्या लोकांकरितां मदत मिळविणे किती कठीण आहे याचा मला चांगलाच अनुभव आला.

५. बौद्धधर्म हा हिंदुधर्माची पुरवणी आहे.

२६ सप्टेंबर १८९३.

 मी बौद्धधर्मी नाही हे आपणास विदितच आहे. तथापि मी बुद्धाचा खरा अनुयायी आहे हे मात्र खरे आहे. चिनी, जपानी अथवा सिलोनी लोक बुद्धानुयायी ह्मणवितात, परंतु हिंदु लोक त्याला प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार मानून त्याची पूजा करितात. बौद्धधर्मासंबंधी कांही टीकात्मक भाषण मी आज करणार आहे, परंतु त्यांत बुद्धावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही. ज्याला परमेश्वरस्वरूप समजून मी भजतो त्याजवर टीका करण्यास मी धजेन तरी