पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

 चुकीचा आहे. हिंदूंतहि इतर लोकांप्रमाणेच अनेक दोष आहेत. परंतु आपण एवढें पकें लक्ष्यात ठेवा की, त्यांच्या सदोष कल्पनांचे पर्यवसान इतरांस त्रास देण्यांत झाले नाही. सती जाणे पुण्यकारक ह्मणून एखादी स्त्री पतीच्या शवाबरोबर आपणा स्वतःस जिवंत जाळून घेईल; परंतु काही शतकांपूर्वी धर्माच्या नांवाखाली मनुष्यांस जिवंत जाळण्याचे जे अत्याचार यूरोपांत घडले, तसली गोष्ट हिंदुस्थानांत स्वप्नांतहि घडून येणे शक्य नाही. कित्येक ख्रिस्ती लोकांनी पूर्वकाली डांकिणी डांकिणी ह्मणून कित्येक स्त्रियांस जिवंत भस्मसात् केलें हें आपणास इतिहासावरून कळून येते. हे पातक ख्रिस्तीधर्माच्या माथी मारणे जसे बरोबर नाही तसेंच कांहीं हिंदूंनी धर्माच्या खोट्या कल्पनांनी अत्त्याचार केले तर त्यांचा दोष हिंदुधर्मावर लादणे बरोबर होणार नाही.

 जगांतील यच्चावत् धर्मपंथ परमेश्वराकडे जाण्याचे निरनिराळे रस्ते आहेत असें हिंदूंचे मत आहे. त्यांत अनेक प्रकारचे मतभेद दिसले तर परिस्थितीप्रमाणे एकच सत्य अनेक रूपें धारण करितें असें हिंदु ह्मणतात. एकाच सूर्याचे किरण निरनिराळ्या रंगांच्या काचेतून आल्यामुळे जसे भिन्नवर्णी आहेत असें वाटते तसेंच धर्मपंथांचेंहि आहे. इतके भिन्न आणि परस्परांस विसदृश असे पंथ असणे अनिष्ट नसून उलट इष्टच आहे. त्यामुळे आपणास काय पाहिजे याची बरोबर निवड करण्यास प्रत्येकास अवसर सांपडतो. बाह्यरूपें निराळी दिसली तरी अंतःस्वरूप व अंतिम हेतु ही एकच आहेत. “ मत्तः परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय । मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥" तसेंच “ यद्यविभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा। तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंशसंभवम् ॥ ” असें जें भगवान् श्रीकृष्णांनी सांगितले आहे याचाहि अर्थ हाच आहे. अनेक युगांच्या परंपरेनें निर्माण झालेल्या या हिंदुधर्माचा मानवजातीवर केवढा उपकार झाला आहे ! परमतासहिष्णुता हिंदूंस आजपर्यंत केव्हांहि शिवली नाही. 'फक्त हिंदूंसच मुक्ति मिळेल' अशा आशयाचे एक तरी वाक्य साऱ्या हिंदू ग्रंथांतून काढून दाखवा असें साऱ्या जगास मी आव्हान करतो. उलट महर्षि व्यास ह्मणत आहेत की 'आमच्या जातीच्या आणि धर्माच्या बाहेरचे असे अनेक पूर्णत्वास पावलेले लोक मी पाहिले आहेत.'

 प्रिय भगिनिबंधूंनो, याप्रमाणे हिंदुधर्माचें सामान्यस्वरूप काय आहे याची माहिती मी आपणांस दिली आहे. हिंदूंनी आजपर्यंत केलेले बेत फलद्रप झाले नसतील. त्यांच्या हातून अनेक चुकाहि झाल्या असतील. परंतु सर्व जगाचा कधीं