पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१७

 असेंहि ह्मणत नाहीत. मूर्तिपूजा ही खालची पायरी झाली ह्मणून ती करणारास अधिक श्रेष्ठ असलेल्यांनी हंसावें हे योग्य आहे काय ? एखाद्या तरुणाने लहान मुलास तें लहान ह्मणून हंसावें अथवा वृद्धाने तरुणास तरुण ह्मणून हंसावें अशाच बालिशतेचा हा प्रकार आहे. मूर्तिदर्शनाबरोबर जर सात्विकभाव कोणाच्या अंतःकरणांत उत्पन्न होत असतील तर मूर्तिदर्शन करणे पाप आहे की काय, याचा आपणच विचार करा. अशा मनुष्याला पुढे मूर्तिपूजेची जरूर वाटेनाशी झाली तरी तो मूर्तिपूजकास खचित नांवे ठेवणार नाही. आपण पूर्वी काही चूक करित होतों-कांहीं वाईट गोष्ट करित होतों-ती सुधारावयाची आहे अशी हिंदूंची कल्पनाच नाही. धर्ममार्ग ह्मणजे सत्याच्या अंधुक कल्पनेतून निघून अत्यंत उज्वल -प्रकाशमय-अशा सत्यांत प्रवेश करावयाचा अशी हिंदूंची कल्पना आहे. आपण मूळचे पापी आहों असें हिंदुलोक समजत नाहीत; तर आपण अत्यंत पुण्यमय व पूर्णस्वरूपाची अनंतरूपें आहोत असे ते समजतात. यामुळे अगदी रानटी मनुष्याच्या धर्ममार्गापासून तो थेट वेदांताच्या अद्वैत सिद्धांतापर्यंत सर्व मार्ग निरनिराळे दिसणारे परंतु एकाच केंद्राकडे पोहोचणारे रस्ते आहेत असें हिंदु मनुष्य समजतो. भिन्न परिस्थिति आणि भिन्न देशकालवर्तमान यांस अनुसरून हे निरनिराळ्या प्रकारचे मानवी प्रयत्न एकाच सत्याच्या शोधांत गुंतले आहेत. हे निरनिराळे लहानमोठे गरूडपक्षी एकाच सूर्यबिंबाकडे धाव घेत आहेत. त्यांतील लहान पक्षी विश्रांतीसाठी एखाद्या मुक्कामावर क्षणभर थांबतात व कांहीं कालाने पुन्हा उडू लागतात; व शेवटी बिंबावर सर्व एकत्र जमतात असा हिंदूंचा सिद्धांत आहे.

 दृश्यविश्व अनेकतेने भासले तरी शेवटी त्यांत एकतानता आहे असें हिंदूंनी जाणले आहे. आपली विशिष्ट मतें ह्मणून ती साऱ्या समाजास एकसहा स्वीकारावयास लावावयाची असा इतर धर्माचा कटाक्ष आहे; जणूं काय एकाच आकाराचा अंगरखा सर्वांनी घातला पाहिजे असा त्यांचा हट्ट आहे. मग तो अंगास बरोबर बसो अगर न बसो. ज्याच्या अंगास बरोबर बसत नसेल, त्याने उघडे भटकावें. प्रतिमा अथवा पुस्तकें ही केवळ मूलरूप व्यक्त करण्याची साधने आहेत एवढेच हिंदूंचे ह्मणणे आहे. या साधनांचा प्रत्येकाने अवश्य उपयोग केलाच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष नाही. याचा उपयोग न करणारा मूर्ख असेंहि त्यांचे ह्मणणे नाही. तसेंच या साधनांचा उपयोग केला ह्मणजे पाप घडतें असेंहि त्यांस वाटत नाही.

 आणखीहि एका गोष्टीचा उल्लेख करणे अवश्य आहे. मूर्तिपूजेत कांहीं भयंकर विधि आहे असा कोणी आपला समज करून दिला असल्यास तो सर्वथैव  स्वा. वि.२