पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२७३


आहे अशी तुह्मीं प्रत्यक्ष प्रमाणाने त्यांची खात्री करून दिली पाहिजे. इतक्या लांबच्या पल्ल्यावर येऊन माझ्यासारखा एकटा मनुष्य काय काय करूं शकणार आहे ? वास्तविक विचार केला तर मी केले इतकेंहि काम करून घेण्याची तुमची किंमत नाही.

 आजपर्यंत जे जे हिंदु लोक इकडे आले, त्यांनी त्यांनी हिंदुस्थानाची आणि हिंदुधर्माची निंदाच केली. कीर्तिलाभ आणि द्रव्यलाभ व्हावा इतक्याच उद्देशाने ते येथे आलेले होते. मग हे लाभ कोणाच्या निंदेने होतात अथवा स्तुतीने होतात, हे पाहण्याचे त्यांस कारणच नव्हते. मी येथे द्रव्यासाठी आलों नाही अथवा कीर्तिसाठीहि आलों नाही, हे तुह्मांस ठाऊकच आहे. माझी इच्छा नसतांहि या दोहोंचा येथे मला लाभ झाला. मी हिंदुस्थानास परत येऊन काय करूं? तेथे मला एक तरी मदतगार मिळणार आहे काय ? घरदार, बायकापोरें वगैरे सोडून देऊन खऱ्या संन्यस्तवृत्तीने धर्मप्रसाराचे काम करावयास मद्रासेंत कोण कोण तयार आहेत, ते मला एकवार कळवाल तर बरे होईल. माझ्या आजपर्यंतच्या मेहनतीने हिंदुधर्माबद्दल येथील लोकांच्या पूर्वकल्पना साफ बदलून गेल्या आहेत. हिंदुमनुष्यापासून इतके उदात्त धर्मविचार ऐकावयास सांपडतील ही कल्पनासुद्धा त्यांस प्रथम नव्हती. काही झाले तरी माझी पाठ सोडणार नाहीत, अशा शेंकडों बंधूंची येथे मला प्राप्ति झाली आहे. येथे आणखी काही वर्षे मी राहिलो तर माझ्या कल्पना चांगल्याच फलद्रप होतील, असा मला पक्का भरंवसा वाढू लागला आहे. येथे एक विश्वधर्ममंदिर बांधण्याचा बूट निघाला होता, पण त्याचे पुढे काय झालें तें समजले नाही. असो. न्यूयॉर्क शहरांत माझें बस्तान चांगलें जुळले आहे; आणि तें अमेरिकेतील अगदी प्रमुख शहर असल्यामुळे माझा कार्यभाग आतां सुरळीतपणे खचित पार पडेल. माझ्या शिष्यशाखेपैकी कित्येकांस बरोबर घेऊन एका आश्रमांत मी लवकरच जाणार आहे. तेथे त्यांस योग, भक्ति आणि ज्ञान यांजवर व्याख्याने द्यावयाची आहेत. ही माझी मंडळी लवकर तयार होण्याजोगी आहे आणि ती तशी तयार झाली ह्मणजे माझ्या कार्यात माझ्या बरोबरीने काम करण्यास या मंडळीचा मला चांगलाच उपयोग होईल.

 आपलें वर्तमानपत्र सुरू करण्यास लागणारा पैसा आणखी सुमारे एक महिन्याने मी पाठवू शकेन. या कामासाठी भिकारड्या हिंदू लोकांच्या दारांत जाऊन तोंड वेंगाडूं नको. परमेश्वराची मजवर कृपा आहे. त्याने मला उत्तम विचारस्वा, वि. १८