पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/291

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

खरी; परंतु असल्या गोष्टीकडे लक्ष्य देण्यास आतां मला वेळ कोठे आहे ? अशा रीतीने आयुष्य व्यर्थ घालविण्यापेक्षा त्याचे अधिक चीज करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या कल्पनांचा अधिक प्रसार व्हावा, त्यांना अधिक मूर्तस्वरूप यावे, अशासाठी तुह्मी आजपर्यंत काय काय केलें ? या दृष्टीने तुमच्या कामाचा आढावा काढिला तर शून्य, महाशून्य, अति मोठे शून्य हाच निघावयाचा.

 परस्पर विश्वास वाढवावा, परस्परांच्या कार्यात मदत करावी आणि कोणीहि थोडेसे चांगले काम केले तर त्याला उत्तेजन द्यावें हे आमच्या लोकांस शिकविणारी एखादी शाळा अवश्य पाहिजे! येथे मी करीत असलेल्या कामाची प्रशंसा करण्यास कलकत्त्याच्या सभेत पांच हजार लोक जमले होते ह्मणतां ! वा ! फार आनंदाची गोष्ट आहे. परंतु इतक्या लोकांजवळ प्रत्येकी एक एक आणा आपल्या कार्यासाठी मागा ह्मणजे जाग्यावर एक इसम तरी शिल्लक राहील तर शपथ! आपले राष्ट्र अद्यापि लोकांनी हाती धरून चालविण्याच्या वयाचे आहे ! तुह्मांला भूक लागली तर वाढलेलें ताट तुमच्यापुढे कोणी ठेवील तर बरें. विशेषतः तुह्मांला कोणी भरवील तर त्याहून बरें, असें वाटण्याच्या स्थितीत सध्यां तुह्मी आहां. असले परावलंबी जीव जगण्यापेक्षां मेलेले बरे !

 मागसलेल्या जातींत शिक्षणाचा प्रसार करण्याची कल्पना सध्या मी सोडून दिली आहे. या गोष्टीलाहि पुढे हळू हळू सुरवात करता येईल. सध्या चोहोंकडे जी निराशा व निरुत्साह पसरला आहे, तो नाहीसा करून लोकांत चेतना उत्पन्न करण्याजोगे खंबीर वक्ते हवे आहेत. सर्व धर्माचें तुलनात्मक शिक्षण देण्याकरितां मद्रासेंत एखादें कॉलेज आपणास स्थापिले पाहिजे. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या तत्वमतांचे तसेंच संस्कृत आणि निरनिराळ्या युरोपियन भाषा यांचे शिक्षण तरुणांस त्या कॉलेजांत दिले पाहिजे. तसेच आपल्या मतांचा प्रसार करण्याकरितां इंग्रजी व देशी भाषेत वर्तमानपत्रे सुरू केली पाहिजेत. जर तुह्मीं यांपैकी काही करून दाखवाल तर खऱ्या कार्यास तुह्मी आरंभ केला असें मी समजेन. आतां बोलण्यापेक्षां कांही करण्याची तयारी प्रत्यक्षपणे तुह्मीं माइया नजरेस आणून द्या. यांपैकी काहींच जर तुमच्याने तेथें करवत नसेल, तर माझें नांव सोडून द्या. माझ्या मनाप्रमाणे मी आपले कार्य येथे होईल तेवढे करीन. माझें ह्मणणे ऐकून घेणारे आणि ते त्यांच्या बुद्धीला पटले तर त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करून दाखविणारे हजारों लोक येथेच आहेत.