पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२६५

णीय भावानांच्या आधीन झालेले लोक अधिक आढळतात. असल्या क्षुद्र जीवांसाठी मी तरी कशाला धडपड करावी ? धर्माचा झेंडा उभारण्यास वाटेल तें करणारे शेंकडों वीर मला पाहिजेत. ते कोठे तुला आढळतात काय ? जा, त्यांची निवासस्थानें शोधून काढून त्यांस बाहेर आण. आतांपर्यंत मला जी काय मोठी आशा तुह्मीं लाविली, ती मोठ्या नांवाची आणि कीर्तीची. नांव आणि कीर्ति! असल्या क्षुद्र गोष्टींचा माझ्यासमोर पुन्हा उच्चार करूं नको. यापेक्षा माझ्या कार्यासाठी हातावर शीर घेणारे शेकडों वीर मला मिळवून देण्याचे वचन द्या. कार्यास आरंभ करा अशी ओरड आणखी किती वेळ मी करूं? छे छे, तुमच्या हृदयास अद्यापि पीळ पडला नाही. माझ्या हृदयांत धडाडून पेटलेल्या आगीच्या ठिणगीचीहि आंच तुह्मांस अद्यापि लागली नाही, हेच खरें. अरेरे! माझ्या स्थितीची तुह्मांस नीटशी कल्पनाहि आली नाही. नाही तर व्यर्थ चकाट्या पिटण्यांत, आळसांत आणि चैनीत तुह्मीं आयुष्य फुकट घालविले नसते. आतां तरी डोळे उघडा. चैन करण्याची ही आपली वेळ आहे काय ? उठा; आतां देहाचा होम करून हजारों लोकांची अंतःकरणे भक्तीने आणि प्रेमाने भरून जातील असें कांहीं करून दाखवा. तुमच्या अंतःकरणांत या कार्याची प्रेरणा व्हावी, कार्यपूर्तीची थोडीशी तरी खरी आंच तुह्मांस लागावी आणि याच कार्यक्षेत्रावर तुह्मांस शूरास उचित असें मरण यावें हीच माझी इच्छा आहे.

 आपल्या कामाबद्दल गोमाजी कापशे अथवा तिमाजी पितळी दरवाजे काय ह्मणतात याकडे आतां लक्ष्य पुरवू नका असा माझा निरोप माझ्या सर्व मित्रमंडळीस सांगा.

आपला,

विवेकानंद.

पत्र १० वे.

ता. १२ जानेवारी १८९५.

प्रिय----,

 कीर्तीसाठी आणि लोकांत मोठे नांव करण्यासाठी कोणतेंहि काम करण्याची माझी इच्छा नाही. हे पुन्हां एकवार आणि शेवटचे माझें तुह्मांस सांगणे आहे. जगाच्या कल्याणासाठी माझ्या कल्पनांचा प्रसार मला करावयाचा आहे. तुह्मीं तेथें जे काय आतांपर्यंत केले त्याने माझें नांव तेथें प्रसिद्ध झाले ही गोष्ट