पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


आहे काय ? मग अत्यंत मोलाचें असें आपले आयुष्य रिकाम्या चकाट्या पिटण्यांत आणि एरंडाची लावण्यांत कां व्यर्थ घालवावें?

 प्रत्येक व्यक्तीला तसेच प्रत्येक राष्ट्राला आपल्या उन्नतीचे मार्ग स्वतःच शोधिले पाहिजेत, हे कितीवेळ तुह्मास सांगावें ! मदतीसाठी दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहून काय होणार ! येथे अविरत उद्योग करून तुमच्या कार्यासाठी थोडाबहुत पैसा मी पाठवीन; परंतु याहून अधिक मदतीची अपेक्षा तुह्मीं करूं नये. येथून विशेष मदत मिळून आपण आपले कार्य करूं असें तुह्मांस वाटत असेल तर अशा कार्यास हात घालण्यापेक्षां अगोदर त्याचा आरंभच करूं नये हे चांगलें. माझ्यासंबंधी ह्मणाल तर माझ्या कल्पना रुजण्यास हीच भूमि फार योग्य आहे. जे जे कोणी परमेश्वराचे अव्यभिचारी भक्त असतील त्या सर्वांच्या पायाचा मी सेवक आहे. मग ते जातीने हिंदु, ख्रिस्ती अथवा मुसलमान असले तरी मला सारखेच.

 अगदी यत्किंचिहि गाजावाजा न करितां काम करीत राहणे, मला पसंत आहे. माझ्या पावलावर पाऊल टाकून माझ्या मागे येण्याची तुमची इच्छा असेल तर शुद्ध अंत:करणाने, पूर्ण संन्यस्तवृत्तीने आणि अत्यंत विमल आचरणाने तुह्मीं वागले पाहिजे. तुह्मी असे असला तर तुमच्या कार्यास माझा आशीर्वाद सदोदित आहेच. मित्रा, आपल्या कार्याच्या मानाने पाहिले तर आपले आयुष्य इतकें थोडे आहे की, आतां अधिक विचाराला आणि परस्परांची स्तुति करण्यांत फुकट वेळ घालविण्याला आपणाला थोडासाहि अवधि उरला नाही. कार्यसमाप्तीनंतर परस्परांची स्तुति करण्यास वाटेल तेवढा वेळ मिळेल. तर आतां ओंठ शिवून टाकून कार्यास आरंभ करा. अद्यापपर्यंत कायमस्वरूपाचे असें कांहीसुद्धां तुह्मीं केल्याचें दिसत नाही. एखाद्या मध्यवर्ति मठाची स्थापना तुह्मीं केली नाही. एखादें देऊळ अगर दुसरी इमारतहि बांधली नाही. फार काय, पण आपल्या कार्यात खांद्याशी खांदा भिडवून काम करणारा असा एक मित्रसुद्धां तुह्मीं अद्यापि पैदा केला नाही. आतांपर्यंतच्या कामाचा आढावा काढला तर वटवट-बडबड-यावांचून कांहीं सुद्धां अधिक आढळून येत नाही; आणि त्या बडबडीचा इत्यर्थ पाहिला तर 'आह्मी एके काळी मोठे होतो, अनुकरणीय होतो' ही आत्मस्तुति. आपण पूर्वी कसे होतो, हे मला ठाऊक नाही पण सध्या मात्र शुद्ध मृत्पिड बनलो आहों हे मला ठाऊक आहे. हिंदुस्थानांत पाहिले तर खऱ्या कार्यासाठी आपणास वाहून घेणारांपेक्षां कीर्तीच्या, पदव्यांच्या, अथवा दुसऱ्या असल्याच तिरस्कर