पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


मार्गास लागला. जातिभेद नष्ट झाला तर जग नष्ट होईल असें जें भगवान् श्रीकृष्णांनी म्हटले, त्याचाहि अर्थ हाच आहे.

 सांप्रतचा जातिभेद हा खरा जातिभेद नसून खरा जातिभेद उत्पन्न करण्याच्या मागोत तो एफ मोठा अडथळा होऊन बसला आहे. त्यामुळे खरा जातिभेद उत्पन्न होण्यास ह्मणजे व्यक्तिशः उत्क्रांति होण्यास अडचण पडूं लागली आहे. जातिभेद जन्मजात आहे, ही कल्पना प्रचारांत आली ह्मणजे निरनिराळ्या अनेक व नव्या नव्या जाति उत्पन्न होण्यास अवकाश न सांपडल्यामुळे असा समाज कुजू लागून मरणाच्या पंथास लागतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जातिभेदाच्या या मूळ कल्पनेचा तुह्मीं त्याग केल्यामुळेच सांप्रतच्या अवनत स्थितीस पोहोंचलां आहां. जन्मजात जातिभेदाच्या शृंखलांनी जखडून बांधलेला समाज खरे जातिभेद उत्पन्न होण्याच्या आड नेहमीच येत असतो. हा खरा जातिभेदच नव्हे. खरा जातिभेद-विचित्रता-विविधता-उत्पन्न होण्याच्या मागोतील हे अडथळे दूर करा, ह्मणजे पुन्हां उत्क्रांतीच्या-उन्नतीच्या मार्गास तुह्मी निःसंशय लागाल. यूरोपांत जेव्हां व्यक्तीच्या मार्गातील अडथळे दूर होऊन ही विविधता अधिक व्यक्त होऊ लागली, तेव्हां यूरोपच्या उदयास आरंभ झाला असें तुह्मांस दिसून येईल. यूरोपापेक्षांहि अमेरिकेंत असा जातिभेद निर्माण होण्यास अधिक अवकाश असल्यामुळे त्यांची उन्नति युरोपियन लोकांपेक्षांहि अधिक झपाट्याने होत आहे.

 प्रत्येक मुलाचा अथवा मुलीचा जन्म झाला ह्मणजे ज्योतिषी लोक त्याचे जातक वर्तवून त्याचा वर्ण अथवा जाति ठरवितात. याचाहि वास्तविक अर्थ हाच आहे. त्या विशिष्ट व्यक्तीची वाढ कोणत्या मार्गाने होण्याचा संभव आहे, त्याचा सूक्ष्म देह कशा प्रकारच्या गुणकर्मानी युक्त आहे हेच ते ठरवितात. याचमुळे ब्राह्मणकुलांत उत्पन्न झालेल्या व्यक्तीचा क्षत्रिय अथवा वैश्यवर्ण आहे असें ज्योतिषी सांगतात. मी वर सांगितलेलें जातिभेदाचें तत्व ज्योतिषासहि मान्य आहे असे दिसते. या तत्वास अनुसरून खरी जातिभेद संस्था आपण निर्माण केली, तर आपल्या उन्नतीस आपण नवजीवन दिल्यासारखे होणार आहे.

 जातिभेद ह्मणजे व्यक्तीची जन्मजात उच्चनीचता दाखविणारी परिस्थिति नव्हे, अथवा त्यामुळे व्यक्तीला काही जन्मजात असे अधिकार प्राप्त होतात असेंहि नाही. माझ्या देशबांधवांस मला जे काही सांगावयाचे आहे तें हेच की, बाबांनों, हजारों वर्षांच्या गुलामगिरीने तुमची जातिभेदसंस्था नष्ट झाली आहे, तिला