पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/279

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.
पत्र ६ वे

प्रिय

न्यूयॉर्क.

 यंदा येथे अतिशय थंडी पडली होती, तरी या देशाच्या बऱ्याच भागांत मी प्रवास केला. थंडीमुळे मला फार त्रास होईलसें वाटले होते पण तसे झाले नाही. तुझ्या कामाला यश येईल अशी आशा करूया. 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' ज्याचा अवतार झाला त्याचा तूं ताबेदार. मग अपयश तुला शिवेल तरी कसे ?
 ख्रिस्ती धर्माचा उपदेश करण्याची जी पद्धत आपणांस हिंदुस्थानांत दिसून येते, त्याहून इकडील पद्धत निराळी आहे. येथील अनेक मतांच्या धर्माधिकाऱ्यात कित्येक माझे चांगले स्नेही झाले आहेत, हे ऐकून तुला खचित नवल वाटेल. हिंदुलोकांप्रमाणे परर्धमसहिष्णु आणि खरे उदारमतवादी असे ख्रिस्ती धर्मोपदेशक येथे किती तरी आहेत. ज्याला धर्मज्ञानाची खरी लालसा आहे, असा मनुष्य कोठेहि जन्मास आला तरी तो अंत:करणानें उदारच असणार. धर्मप्रेम अंतःकरणांत उद्भवले म्हणजे त्याचे विचार आपोआपच उदार होतात. धर्मज्ञानदान ह्मणजे पोटाचा एक व्यवसाय असें झालें ह्मणजे इतरांशी मत्सर, चढाओढ, निंदकवृत्ति, अनुदारता इत्यादि अनेक दुर्गुण अंत:करणांत आपोआप उद्भवू लागतात.

आपला,

विवेकानंद.

पत्र ७ वे.

न्यूयॉर्क-१८९४.

प्रिय
 आज एक जुनी दंतकथा मी तुला सांगणार आहे, तिजकडे नीट लक्ष्य एके दिवशी कोणी एक आळशी मनुष्य एका वृद्ध गृहस्थाच्या जाऊन त्याला एका गांवाचा रस्ता विचारूं लागला. परंतु त्याच्या प्रश्नास त्या गहस्थानें कांहींच जबाब दिला नाही. तोच प्रश्न त्या मनुष्यान पुन:पुन: कित्येक वेळा विचारला, परंतु त्या वृद्ध गहस्थाचें तोंड उघडले नाही. त्या वृद्धाच्या या कृतीचा त्या मनुष्यास फार राग येऊन तो तेथून जाण्यास निघाला. तेव्हा वृद्ध आरडून ह्मणतो, "अहो, तें गांव येथून समोरच एक मैलावर आहे." आळशी मनुष्य म्हणतो " आजोबा, मी जेव्हां आपणास प्रथमच प्रश्न केला. तेव्हां आपण