पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२५१

गुलामगिरीत वाढलेल्या समाजांत परोत्कर्षासहिष्णुता उत्पन्न होणे, हे रास्तच आहे. या दुर्गुणाच्या जोडीस भेदभाव येऊन मिळाला ह्मणजे गुलामगिरीच्या शृंखलेचे सांधे पक्के होतात. हिंदुस्थानांतून बाहेर पडून इतर देशांच्या स्थितीचें अवलोकन केलें ह्मणजे वरील सिद्धांताची सत्यता चांगली पटते. पाश्चात्यांना चोहोंकडे जो एकसारखा जय येत आहे, त्याची मुख्य कारणे परस्पर विश्वास आणि संघशक्ति ही होत. कोणतेही राष्ट्र एकवेळ दुर्बळ आणि भेकड झाले ह्मणजे विश्वासघाताच्या पातकाचे बी तेथे चांगले रुजू लागते.

 माझ्या बाळा, गुलामगिरीत खितपत असलेल्या जनसमाजाकडून तूं कसल्याहि मदतीची अपेक्षा करूं नको. सध्याची परिस्थिति अत्यंत बिकट-अत्यंत निराशाजनक आहे, ही गोष्ट खरी, परंतु तिजविषयी माझे ह्मणणे मोकळेपणाने मी तुह्मां सर्वांस सांगतो. आमच्या सध्यांच्या समाजास कसली महत्वाकांक्षाच उरली नाही. भविष्यकालीं आपण आपली स्थिति उच्च प्रतीची करूं असा आत्मविश्वास तर त्यांच्या ठिकाणी नाहींच; पण दुसरा कोणी त्यांच्यासाठी मनापासून खटपट करूं लागला, तर त्याच्या कांटे पसरण्याचे काम करण्यास मात्र हवे तितके लोक तयार होतात. असल्या मृत्पिडांच्या समाजांत थोडे तरी चलनवलन-थोडी तरी जीवनकला-उत्पन्न करण्याचे सामर्थ्य तुमच्यांत आहे काय ? एकादें अत्यंत हट्टी मूल औषध पितांना जसें वैद्याला लाथा मारितें, तसा आमचा समाज आहे. त्या वैद्याचे चातुर्य तुमच्या अंगी आहे काय ? एखादा अमेरिकन अथवा युरोपियन गृहस्थ परदेशांत आपल्या देशबांधवाला नेहमी मदत करीत असतो.

 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।' या भगवंताच्या वाक्याचे मी पन्हां एकवेळ तुला स्मरण देतो. परिस्थिति कशीहि असो, आपण नेहमीं पर्वताप्रमाणे अढळ राहिले पाहिजे. सत्याचा जय केव्हां ना केव्हां तरी होणारच. भगवान श्रीरामकृष्णांच्या मुलांस उत्तम आत्मविश्वास प्रथम पाहिजे. आपल्या सदसद्विवेकबुद्धीच्या विरुद्ध केव्हांहि वागावयाचें नाहीं असा पक्का निश्चय पाहिजे; ह्मणजे सर्व काही सुरळित होईल. आपल्या कार्याचा उत्तम परिपाक स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याइतके आयुष्य कदाचित आपणांस प्राप्त होणार नाही, पण आपल्या कार्याचा शेवट उत्तम होणार, याबद्दल तिळमात्र शंका नको. भरतभूमीच्या मृतप्राय देहांत चैतन्य भरेल, तिला नवजीवन प्राप्त होईल असे प्रयत्न सध्या हवे आहेत. असे प्रयत्न यशस्वी होण्यास अधिक काळ लागेल हे उघडच