पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

तुम्ही आपले काम करीत असावे, हे बरें. कोणी काही म्हटले तरी 'न हि कल्याण कृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति' हे भगवान् श्रीकृष्णाचे वचन आपण नेहमी ध्यानांत ठेवावें. माझ्या धर्मशिक्षणाचे रहस्य समजून घेऊ इच्छिणारांची संख्या येथे दिवसेंदिवस वाढत आहे. 'जो निंदेते नेधे । स्तुति न श्लाघे ।' अशा प्रकारचे वर्तन ठेवण्याचा निश्चय मी केला असल्याचे आपणांस पूर्वी कळविलें आहेच आणि आतांहि कळवितों. मला कोणी असले उतारे पाठविले तर ते मी 'भस्मसात् ' करितों आणि आपणहि तसेंच करावें. आपण आपले कर्तव्य खऱ्या अंतःकरणाने करीत असलें ह्मणजे शेवटी सर्व गोष्टी सुरळीत होतात. 'सत्यमेव जयते' हा नेहमीचाच सिद्धांत आहे.

 आपणाविषयी लोकांचा गैरसमज होण्याजोगे लेख ख्रिस्ती मिशनरींनी लिहिले तर त्यांजकडे आपण लक्ष्य देऊं नये, हा उत्तम पक्ष. अशा लेखांची पूर्ण उपेक्षा करणे हेच त्यांस खरें उत्तर आहे.

 एस-यांस आपल्या संघाचे अध्यक्ष करा. ते दिलदार आणि खऱ्या अंत:करणापासून काम करणारे गृहस्थ आहेत. आतां माझ्याकडून मदतीची फारशी अपेक्षा न करितां कामास सुरुवात करा. मी तिकडे केव्हां परत येईन हे आज मला सांगतां येत नाही. मी येथें जें कार्य करीत आहे तेंहि माझ्या मातृभूमीसाठीच आहे. सर्वांस माझा पूर्ण आशीर्वाद सांगावा. ईश्वर आपले कल्याण करो.

आपला,

विवेकानंद.

पत्र ५ वें.

शिकागो, ता.-९४

प्रिय
 तुमचें पत्र आतांच पावलें. दोन तीन वर्षे व्याख्याने देऊन पैसे मिळविणे हैं या देशांत फारसें कठीण नाही. यासंबंधी मी थोडासा प्रयत्न करून पाहिला. पैशाच्या दृष्टीने माझा प्रयत्न यशस्वी होईल इतका पाठिंबा लोकांकडूनही मला मिळाला; परंतु ही गोष्ट मला स्वतःलाच अप्रशस्त व माझ्या संन्यस्तवृत्तीला कमीपणा आणणारी वाढू लागली.

 हिंदुस्थानांतील काही पत्रांनी मजवर केलेली टीका माझ्या अवलोकनांत आली. परंतु अशी टीका होणे, हे भरतभूमीच्या सध्याच्या स्थितीत रीतसरच आहे.