पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.
पत्र २ रे.

प्रिय--

 कलकत्त्याच्या टाऊन हालांत सभा भरून पास झालेल्या ठरावांची नक्कल मला मिळाली. तसेच माझ्या देशबांधवांनी मला पाठविलेला प्रेमसंदेशहि पोहोचला.

 माझ्या हातून जी थोडीबहुत सेवा होत आहे, ती तुम्ही गोड करून घेतां याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे.

 इतर राष्ट्रांशी अगदी तुटून राहावयाचे, असा बाणा बाळगणारे कोणतेंहि राष्ट्र जिवंत राहावयाचे नाही, अशी माझी पक्की खात्री झाली आहे. स्वतःच्या मोठेपणाच्या खोट्या कल्पनांनी, अथवा ऐहिक फायद्याकरितां राजनीति म्हणून, अथवा स्वतःचा पवित्रपणा कायम राखण्यासाठी जेव्हां एखाद्या राष्ट्रांत वरील वृत्तीचा उदय होतो तेव्हां तें राष्ट्र विनाशाच्या मार्गास लागले म्हणून समजावें.

 शेजारच्या बौद्धधर्मी राष्ट्रांचा संपर्क आपल्या हिंदुत्वास बाधक होईल म्हणून विशिष्ट जातिबंधनांचा तट ज्या काली हिंदुसमाजाभोवती उभारला गेला, तेव्हांच त्याच्या कोंडमाऱ्यास सुरुवात झाली असे मला वाटते. अशा कोंडमाऱ्याचा अवनति हा निश्चित परिणाम आहे.

 परकीयांचा द्वेष जो आमच्या हाडीमाशी खिळला आहे, त्याला कितीहि धार्मिक रूप दिले, तरी द्वेषाचा निश्चित परिणाम जी अवनति, ती टाळता येणे शक्य नाही. कोणत्याही कारणासाठी का होईना, तुम्ही परद्वेष करूं लागलां म्हणजे तुमचीच अवनति होणार ही नियति आहे. जो देश एकाकाळी सर्व भूगोलाचा पुढारी व मार्गदर्शक होता, तोच आतां इतर राष्ट्रांचा हास्यविषय होऊन बसला आहे ! जणूं काय वरील सिद्धांताची सत्यताच तो कंठरवाने सांगत आहे! जो सिद्धांत आमच्या पूर्वजांनी शोधून काढिला व ज्याचा सर्वत्र प्रसार कला त्या सिद्धांताचे उल्लंघन केल्याचा काय परिणाम होतो, हे जणूं काय आम्ही वस्तु पाठदर्शनाने जगास शिकवीत आहों!

 परस्पर विनिमय अथवा 'दे वाण घे वाण' हा विश्वाचा नियम आहे. आणि आपली उन्नति व्हावी असे वाटत असेल तर आपणांपाशी असलेला निधि उघडून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांनी त्याचा उपयोग करावा, अशी परवानगी भरतभूमीने दिली पाहिजे; तसेच इतर राष्ट्रांपाशी जें जें म्हणून घेण्याजोगे आढळेल, त्याचा तिने स्वीकार केला पाहिजे. दिवसेंदिवस वाढत जाणे, मोठे होत जाणे हे जीवंतपणाचे चिन्ह आहे. तसेंच आकुंचित होणे हे मृत्युपंथास लागणे होय. अजात