पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

२११

हारिणी भागीरथीच्या काठी राहून विहीर खणण्यासारखाच हा शहाणपणा आहे. हीरकमण्यांच्या खाणीत राहून 'मला कांचेचा लोलक कोणी देईल काय?' असें ह्मणावयाचे हे शहाणपणाचे लक्षण आहे काय?

 लौकिक वस्तूंची हांव धरून त्या दृष्टीने परमेश्वराची प्रार्थना करणे यासारखा मूर्खपणा दुसरा कोणताच नाही. सर्वेश्वरापाशी आपण ज्ञानाची याचना करावी, निर्हेतुक प्रेमाची याचना करावी अथवा दृढश्रद्धेची याचना करावी. 'अमुक वस्तूशिवाय माझें अडेल,' 'अमका माझें बरें करील' अथवा 'तमका माझ्या उपयोगी पडेल' अशा प्रकारचें दौर्बल्य आणि परावलंबित्व मानवी हृदयांत आहे तोपर्यंत क्षुद्र जिनसांसाठी परमेश्वराची प्रार्थना करण्याची त्याची इच्छा राहीलच; परंतु सशास्त्र आणि पायाशुद्ध ज्ञानाने ज्यांची खरी श्रद्धा बळावली आहे, अशा मनुष्यांना लौकिकसुखाची प्रायः चाडच उरत नाही. मग ते असल्या प्रकारची प्रार्थनाहि करणार नाहीत हे उघडच आहे. त्यांच्या ठिकाणचे 'मी' नष्ट होऊन त्या जागी 'तूं' आलेले असते. ज्यांची इतकी तयारी झाली असेल ते निराकाराच्या मार्गास लागण्यास योग्य झाले असे समजावें. निराकाराच्या उपासनेचा मार्ग ह्मणजे गुलाम आणि धनी अशा नात्याचा नाही. 'मी दुर्बल आहे, पापी आहे,' आणि 'तूं समर्थ, पुण्यात्मा आहेस' ही निराकाराची उपासना नव्हे. हा निराकाराच्या उपासनेचा मार्गच नव्हे. 'मी' नष्ट होऊन सर्व 'तूंच' राहिल्यावर पापी कोण आणि पुण्यवान् कोण !

 फारशी भाषेतील एका कवितेचे इंग्रजी भाषांतर तुमच्या वाचण्यांत आले असेलच. एकेवेळी कोणी पुरुष आपल्या प्रियेस भेटण्याकरितां तिच्या घरी जाऊन त्याने दारावर थाप मारली. तेव्हां तिने 'कोण आहे ?' असा प्रश्न विचारला. तो ह्मणाला, 'मी अमुक तुझा प्रियकर.' उत्तर देऊन दार उघडेल अशी त्याला अपेक्षा होती; पण ती पुरी न होतां दार बंदच राहिले. काही दिवसांनी तो पन्हां गेला व तीच प्रश्नोत्तरे पुन्हां झाली व पुन्हांही दार बंद राहिले. तिसऱ्या वेळी तो पुन्हां गेला व त्याने दारावर पुन्हां थाप मारली. पुन्हां आंतून तोच प्रश्न. 'कोण आहे ? ' त्यावर 'तूंच दाराबाहेर उभी राहून हांका मारीत आहेस. तूं आणि मी ही दोन नसून एकच आहों' या उत्तराने शेवटी दार उघडलें. निराकाराची उपासना केवळ सत्यमार्गानेच करता येते. भक्त स्वतः ब्रह्मरूप असल्यामुळे त्याने या भावनेचा केव्हाही त्याग न करणे हाच सत्य मार्गत्याचें सदोदित चिंतन 'अहं ब्रह्मास्मि' हेच असले पाहिजे. मी आणि तूं भिन्न