पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

यावरून वेदांतधर्माने सांगितलेली तत्वें भौतिकशास्त्रांच्या सिद्धांतांविरुद्ध नाहीत; एवढेच नव्हे तर तेच सिद्धांत वेदांताच्या आधाराने अधिक चांगल्या प्रकारे सिद्ध होतात. 'सर्वं खल्विदं ब्रह्म' असा वेदांताचा सिद्धांत आहे. ब्रह्म हेच सर्वांचे अधिष्ठान असून त्याबाहेर कांही राहू शकत नाही. ब्रह्म विश्वबाह्य नसून विश्वांतील यच्चयावत् पदार्थात भरून राहिले आहे किंबहुना सर्व दृश्य सृष्टी हे ब्रह्माचेंच व्यक्तरूप आहे. पुरुषांत आणि स्त्रीत एकाच ब्रह्माची व्याप्ति आहे: आपल्याच गर्वात छाती काढून चालणारा तरुण बांड जसा ब्रह्मरूप आहे, तसाच पाठीची कमान झालेला व काठीच्या आधाराने पाउले टाकणारा वृद्धहि ब्रह्म आहे. आपण जें जें कांही पाहतों, व ज्याला ज्याला स्पर्श करतो तें सर्व आहे. आपण सर्व ब्रह्मांत वास करतों, सर्व व्यवहार करतों व त्याच्याच आश्रयाने जगतो. या प्रकारची कल्पना नव्या करारांतहि आढळून येते. चोहोंकडे परमेश्वराची व्याप्ति आहे, तो सर्व दृश्याचे सत्वसार आहे, वस्तूमात्राचा अंतरात्मा तोच आहे, ही कल्पना नव्या करारांतहि ग्रथित केली आहे .जग दृश्य स्वरूपास येते याचा अर्थ असा आहे की अव्यक्त ब्रह्म व्य्क्तस्वरुपास येतें. सच्चिदानंदस्वरूप व्यक्त होण्याचे आपण सर्व मार्ग आहो. आ शरीररूपी लहान लहान प्रवाहांनी ब्रह्मच वाहत आहे. मनुष्यामनुष्यात देवदुतांत आणि मनुष्यांत, मनुष्यांत आणि पशूत. पशूत आणि वृक्षात व वृक्षात आणि दगडांत जो भेद दिसतो, तो मूलस्वरूपाचा भेद नव्हे. या सर्वातील सारभूततत्व एकच असल्यामुळे त्या सर्वांची जात एकच असें ह्मणण्यास हरकत नाही. फरक दिसतो तो कमीअधिक परिमाणामुळे उत्पन्न झालेला आहे. माझ्या व्यक्तपणाचे परिमाण कमी असले तर मला कमी दर्जाचा असे समजतात. याच रीतीने व्यक्तपणाच्या अधिक परिमाणामुळे तुझी माझ्यापेक्षा कदाचित अधिक उच्च दर्जाचे असाल . येथे दर्जा कमीअधिक वाटतो त्याचे कारण मूलतत्वातील उच्चनीच भाव नव्हे; तर त्याच्या व्यक्त होण्याच्या परिमाणातील कमीअधिकपणा हेच त्याचे कारण आहे. तुमच्यांत माझ्यांत काय अथवा पशु आणि दगडात काय, एकाच परमात्मरूपाची व्याप्ति आहे. याकारता तुम्ही , मी आणि इतर सर्व सृष्टि वस्तुतः परमात्मरूपच आहे. परमेश्वररूप असणे हा जसा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे तसाच माझाहि आहे. तुह्मी केवळ पावित्र्याचे पुतळे आहात आणि मी केवळ पापमूर्ति आहे, तथापि तुमच्या पुण्य रूपांत एकच सच्चिदानंद भरून राहिला आहे. तुमच्या व्यक्तपणाचें परिमाण