पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

चुकीचे आहे. आपण निवळ जडवादी आहों असें गृहीत धरले, तर आपल्या मतें सर्व दृश्य विश्व ह्मणजे अनेक जड पदार्थाचा एक मोठा समुद्र आहे, हाच आपला शेवटचा सिद्धांत होईल. समुद्रांत ज्याप्रमाणे निरनिराळ्या लाटा उत्पन्न झालेल्या दिसतात, त्याचप्रमाणे तुह्मी, मी आणि इतर लोकहि या प्रचंड जडसमुद्रांतील लहानलहान लाटांसारखेच आहों असें म्हटले पाहिजे. एकच प्रकारचे जडपदार्थ एकत्र येऊन कांही वेळ लाटेसारखे दिसतात आणि ती लाट फुटल्यावर ते पुन्हां विस्कळित होतात, असेंच मानणे भाग आहे. समुद्रांत लाटा उत्पन्न झाल्या आणि मोडल्या ह्मणजे सर्व पाणी एकत्र मिसळले जाते; आणि पुन्हां लाटा उठू लागल्या ह्मणजे पहिल्या लाटांच्या पाण्याची अदलाबदल होतेच. त्यांत अमुक पाण्याच्या अमुक लाटा अशी निवडानिवड करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे पूरी आपण सर्व निरनिराळ्या लाटा होतो. मध्यंतरी आपण विस्कळित स्वरूपास गेला; आणि आतां पुन्हां लाटांच्या रूपाने उद्भवलों. अशा स्थितीत माझ्यांतील जडपदार्थ सूर्योत अथवा तुमच्यांतील जडपदार्थ एखाद्या वनस्पतींत गेले नसतील अस कोणी ह्मणावें ? ह्मणजे अशारीतीने तुमच्या आमच्यांतील व विश्वांतील यच्चयावत् सृष्ट पदार्थात अदलाबदल चालू असतां आपण शरीराने तरी भिन्न कसे असणार ? अशारीतीने आपली शरीरें भिन्न दिसत असतांहि त्यांत एकतानता आहे ही गोष्ट सिद्ध होते. अशाच रीतीने चैतन्यांतहि एकतानता आहे हे सिद्ध करणे कठीण नाही. अनेक विचारतरंगांचा जो एक समुद्र आहे, त्यांतील काही विचार एकत्र होऊन माझें मन, तुमचे मन व इतर लोकांची मने तयार झाली आहेत. अंतर्यामी या सर्वांची अत्यंत एकतानता आहे. फार लांब कशाला? मी आतां बोलत आहे व आपण ऐकत आहां; आणि याचवेळी आपल्या विचारांची झपाटयाने अदलाबदल होत आहे, हे थोड्या विचाराअंती आपल्या लक्ष्यांत येण्याजोगे आहे. अशारीतीने आपणा सर्वांत बाह्यतः भेद दिसला तरी वस्तुतः आपण सर्व विचाराने एकरूपच आहों असें सिद्ध होते. ज्या अर्थी आपण शरीराने व मनाने एकच आहों, त्या अर्थी ही दोन्ही ज्या मूळस्वरूपापासून उद्भवली आहेत ते आमचें मूळरूपहि एकच असले पाहिजे हे उघड होत नाही काय? यावरून आमचे निराळेपण हा केवळ दृश्याभास असून आपण सर्व वस्तुतः एकरूपच आहों, असें नि:संशय सिद्ध होते. आजपर्यंत भौतिकशास्त्रांनी जितके शोध लाविले तितक्या सर्वांचे पर्यवसान शेवटी याच सिद्धांतांत होणार, अशी उघड चिन्हें आज दिसू लागली आहेत. छाती काढून आपल्याच डौलांत चाल