पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

'जमिनीवरील अदृश्य भुताने तें खाली ओढले.' अशा उत्तराच्या मासल्याचेच वरील उत्तर आहे. निराधार वस्तू पृथ्वीवर कां पडतात, याचे अधिक समाधानकारक उत्तर दिल्यामुळे पदार्थविज्ञानशास्त्राची वाढ झाली आणि धर्मशास्त्राने हे उत्तर देण्याची टाळाटाळ केल्यामुळे त्याची पिछेहाट झाली.

 प्रत्येक क्रियेचे कारण बाह्य पदार्थावर अवलंबून नसून त्या त्या क्रियेच्या अंतरंगांतच असतें व तें शोधून काढले पाहिजे, अशी प्रवृत्ति भौतिकशास्त्रांनी रूढ केल्यानंतर उत्क्रांतिवाद अस्तित्वात आला. उत्क्रांतिवाद हा या प्रवृत्तीचेंच साक्षात् फल आहे. प्रत्येक पदार्थ आपल्या पूर्वीच्या स्थितीचेंच रूपांतर आहे, हा उत्क्रांतिशास्त्राचा मूलभूत सिद्धांत आहे. उदाहरणार्थ, ऊस हा गवताच्या काडीपासून निर्माण झाला असें उत्क्रांतिशास्त्राचे मत आहे. या उदाहरणांत गवताच्या काडीचे जे घटक आहेत, त्यांचेच परिस्थितीने रूपांतर होऊन, त्यांना उसाचें स्वरूप प्राप्त झाले, असे उत्क्रांतिशास्त्राचे मत आहे. ह्मणजे गवत हे कारण आणि ऊंस हे कार्य असे असून कारणांचेच रूपांतर, परिस्थितीमुळे कार्यात झाले. कारण आणि कार्य यांचे घटक भिन्न नसून परिस्थतीमुळे त्यांच्या दृश्य स्वरूपांत मात्र फरक पडतो व आपण एकाला कारण आणि दुसऱ्याला कार्य अशी वेगळी नांवें देतो, इतकेंच. हा उत्क्रांतिशास्त्राचा मूलभूत सिद्धांत आहे. दृश्य कार्याचे सर्व घटक सूक्ष्म रूपानें कारणांतच वास करीत असून अनुकूल परिस्थितीमुळे तेच घटक दृश्य स्वरूपास येऊन कारणच कार्यरूप होते. यावरून जे पदार्थ आज अस्तित्वांत आल्याचे दिसत आहे,ते नवीन उत्पन्न झाले नसून पूर्वीच्या सूक्ष्म घटकांची रूपांतरें मात्र आहेत, असे सिद्ध झाले. याचा अर्थ असा आहे की, विश्वांतील प्रत्येक कार्य, पूर्वीच्याच कारणाचे परिस्थित्यनुरूप झालेलें रूपांतर आहे. एकंदर विश्वांत हीच कारणकार्यपरंपरा चालू असून तिचे कारण शोधण्यास आपणास विश्वाच्या बाहेर जावयास नको. सर्व कारणकायें विश्वांतर्गत आहेत. अनेक वस्तू आणि परिस्थिती यांचे कारण विश्वबाह्य नसून त्या त्या वस्तूंत व परिस्थितीत अंतर्भूत झालल आह. या गोष्टी उत्क्रांतिशास्त्राने सिद्ध केल्यामुळे जे धर्म विश्वबाह्य परमेश्वराच अस्तित्व मानतात, त्यांचे महत्व आपोआपच कमी होऊन. ते ढांसळवायास सुरवात झाली.

 भौतिकशास्त्राचे सिद्धांत मान्य करूनही स्वतःचे सिद्धांत अबाधित आहत असे दाखविणारा एखादा धर्म असेल, तर त्याची जरूर सध्याच्या काळी आहे. ज्ञान या शब्दाची वास्तविक व्याख्या काय आहे, याचे विवेचन आपण नुकतेच केले आहे. ज्ञानाच्या त्या व्याख्येस, व उत्क्रांतिशास्त्रांच्या तत्वांस जुळणारा