पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२००

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

शास्त्रे यांजमध्ये लढाईचे प्रसंग वारंवार घडून येतात. धर्मशास्त्राला वाटते, की, आपण उच्च प्रदेशींचे रहिवाशी. आपण म्हणूं तें इतर शास्त्रांनी मुकाट्याने मान्य करावे. त्यावर 'कां' हा प्रश्नहि विचारण्याची त्यांची योग्यता नाही. धर्मशास्त्राच्या एखाद्या सिद्धांतावर कोणी आक्षेप घेण्याची छाती केलीच तर त्या विचाऱ्यावर धर्मलंड व नास्तिक असा शिक्का बसतो. परंतु भौतिकशास्त्रांचें हत्यार, धर्माला वाटते तितकें बोथट नसल्यामुळे अनेक चकमकीत पराभव पावून आपला जीव गमावण्याचीहि पाळी धर्माला आली. इतिहासांत असे अनेक प्रसंग पूर्वी घडून आल्याचे नमूद केले आहे; इतकंच नाही तर आजमितीसहि अशा प्रकारच्या लहानसहान चकमकी सर्व देशांत चालू आहेत. फ्रेंच लोकांनी राजसत्ता उलथून पाडून प्रजासत्ताक शासनपद्धति सुरू केली, तेव्हां विवेचकबुद्धीच्या नावाखाली तेथें केवढे अत्याचार झाले, हे इतिहासज्ञांस विदितच आहे. त्यावेळी तेथे ख्रिस्ती धर्माचा लोप होऊन त्याच्या जागी फ्रेंच लोकांनी 'विवेचकवुद्धीची देवता' (Goddess of Reason) स्थापिली होती. ख्रिस्ती धर्मप्रचाराकांची अनिरुद्ध सत्ता लोकांनी साफ झुगारून दिली होती. धर्माविरुद्ध हे बंड त्यावेळी प्रथमच घडले नसून त्या पूर्वीहि अनेक वेळां असले प्रकार झाले होते. फ्रान्स देशांतील बंडाचे स्वरूप अतिशय उग्र होते, इतकेंच. सूक्ष्म विचार करतां सांप्रतकाळींहि धर्मशास्त्र आणि इतर भौतिकशास्त्रे यांजमधील भांडण बऱ्याच उग्र स्वरूपाचे आहे. धर्माच्या बाबतींत पूर्वीपेक्षा अधिक स्वतंत्रता असल्यामुळे सांप्रत रक्तपाताचे प्रसंग येत नाहीत हे खरे, पण त्यामुळे भांडणाचें स्वरूप कमी उग्र आहे, असें मात्र म्हणतां येत नाही. भौतिकशास्त्रांची युद्धसामग्री पूर्वीपेक्षा किती तरी पटीनें सुधारली आहे, आणि रोज नव्या शस्त्रास्त्रांची भर त्यांच्या शस्त्रागारांत पडत आहे. उलट धर्माची बाजू पाहतां ती मात्र अधिक लंगडी झाल्याचे आढळते. भौतिकशास्त्रांनी धर्माचा पाया बहुतांशी पोखरून टाकला आहे. आपणांपैकी बहुतेकांच्या अंतःकरणांत या गोष्टीची जाणीव आहे. एखाद्या सभेत भाषण करतांना धार्मिकपणाचा आव घालणारे पुष्कळ लोक आढळेतील; परंतु त्यांचे अंतःकरण त्यांच्या शब्दांचा कितपत अनुवाद करत याचा त्यांनी खऱ्या दिलाने खुलासा केला, तर त्यांतील बहुतेकांस नास्तिक ह्मणवून घेण्याचाच प्रसंग येईल ! धार्मिकपणा आपल्या बुद्धीस शिकविण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी अनेक शास्त्रांच्या परिचयाने चवचाल झालेली त्यांची बुद्धि त्यांच्याशी वाद घालू लागते, त्याला ते काय करणार ! बुद्धि ह्मणते, 'अमक्या तमक्याने