पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१९३

अंतःकरणाच्या सात्विक वृत्ति जागृत करण्याकडे आपण केव्हांहि लक्ष्य देत नाही. पाश्चात्य संस्कृतीत जे काही दुर्गुण आहेत त्यांत हा मोठा भयंकर दुर्गुण आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, आह्मीं पूर्वीपेक्षां दसपट स्वार्थसाधु मात्र बनलो आहों. आज नाहीं उद्यां, पण या स्वार्थीपणाचे परिणाम आह्मांस खचित अवनतीस नेल्यावांचून राहणार नाहीत. यासाठी आपल्या अंत:करणाच्या सात्विक वृत्ती सदोदित जागृत राहतील, असे उपाय आपण योजिले पाहिजेत. जेथे बुद्धि आणि अंतःकरण यांचे मार्ग भिन्न असतात, तेथे बुद्धिगम्य मार्ग सोडून अंतःकरणदर्शित मार्गाने जाणे आपणांस परिणामी अधिक हितावह आहे. एखादें सत्कर्म करावे अशी इच्छा उद्भवली की आपली बुद्धि जागृत होऊन निवडानिवड सुरू करते व तितक्यांत स्वार्थ प्रबल झाला, की, अंतःकरणाच्या सात्विकवृत्तीने राम हटलाच. एखाद्या दुबळ्याला मदत करावीशी इच्छा आपणांस झाली की बुद्धि ह्मणते, 'हा लुच्चा तर नसेलना? हा उद्योग कां करीत नाही? हा आळशी का झाला?' अथवा याला सशास्त्र रूप द्यावयाचें म्हटले ह्मणजे 'आळशाला मदत का करावी? त्यामुळे जगांत आळस वाढणार ! लोकांना आपण उद्योगी केले पाहिजे.' झाले. बुद्धीचा निश्चय झाला की तो मदतीस पात्र नाही.त्या दुबळ्याला पाहून अंतकरणांत उत्पन्न झालेल्या दयेचा प्राण गेला. मित्रांनो, अशावेळी या बुद्धीच्या नादी लागून आपण आपली फसवणूक मात्र करून घेतों. यःकश्चित् स्वार्थाला बळी पडून दयेचा खून करण्यास आपण उद्युक्त होतो. अत्यंत बुद्धिमानाला स्वप्नांतहि दिसणार नाही अशा ठिकाणी पोहोचण्याचे सामर्थ्य एकटया अंतःकरणास मात्र आहे. जेथें परमेश्वराची व आपली प्रत्यक्ष भेट होते, त्या ठिकाणी बुद्धि कधीहि पोहोचू शकणार नाही. तो अधिकार एकट्या अंतःकरणाचाच आहे. 'अल्लाकु मिला चाहे तो तूं मैंकुं बिसर जा। गर इषये लिये चाहे तो तूं शिरकुं बिसर जा ॥ असा उपदेश साधुसंत आमच्या काण कपाळी ओरडत आहेत. परमेश्वराचा प्रवेश बुद्धीत होत नसून अंत:करणांत होय अंतःकरणाची उत्तम वाढ झाली तर तुह्मी अतींद्रिय ज्ञान बोलू लागाल.शाच्या भ्रम वाढतो. अंतःकरणाने ज्ञान जागृत होते. आपण कोणाशी अत्यंत ल्यामुळे गोष्टी बोलत असतो, त्यावेळी आपली बुद्धि कोठे असते, याचा विचार केली ज्यावर आपले खरे प्रेम असते त्याच्याशी अमुक बोलावे की नाही, हा विचार जज कधी तरी करतो काय ? 'प्रीतीचिया बोला नाहीं पेस पाड । भलतसें गार करुनी घेई ॥' असा अनुभव आपणांस नित्य येत असतो. तेथे बुद्धि जागृतस्वा. वि. १३