पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

निराशावादी लोकांना त्यात काट्याकुट्यावाचून काहीच दिसत नाही. लक्षावधी मनुष्यात एखाद्याला जगाचे बरोबर स्वरूप ठाऊक असते. बाकीच्यांपैकी कित्येकांच्या अगदी विचित्र कल्पना असतात व दुसरे कित्येक एकाच कल्पनेच्या मागे लागून वेडे झालेले असतात. सुदृढ प्रकृतीच्या तरुणांस जगांतील सर्व संपत्ति मिळण्याची आशा वाटत असते. आपण अमुक एक वस्तु मिळवू शकणार नाही, असे त्यांस कधीच वाटत नाही; परंतु हेच लोक जगांतील टक्केटोणपे खातां खातां इतके गलितवीर्य होतात की वृद्धपणी त्यांना या जगांत दुष्टपणाशिवाय दुसरें कांहींच दिसत नाही. कोठे तरी सांधीकोपऱ्यांत बसून जगाच्या नांवानें खडे फोडावे आणि इतरांस निरुत्साह करावें, इतकाच यांना धंदा उरतो. थोड्याशा दुःखामुळे झुरूं लागावें अथवा तुच्छ सुखकल्पनांमागें धावावें हे आपल्या मनुष्यपणास खरोखर लांछनास्पद आहे. या दोन्ही अवस्था झुगारून देऊन दोहोंच्या मध्यभागी मेरूसारखें अचल आणि समतोल राहणे यांतच खरें मनुष्यपण आहे. आमच्या स्थितीचा खऱ्या दृष्टीने विचार केला तर आमचें बाल्य जणूं कधी संपतच नाहीं ! जरा कोणी रागें भरल्याबरोबर मूल जसें रडू लागते आणि तितक्यांतच कोणी खाऊ दिल्याबरोबर हंसूहि लागते, तशीच आह्मां मिशाळ मुलांचीहि अवस्था आहे. जगानें आपलें स्वरूप थोडें उग्र केल्याबरोबर आमचा थरकांप होतो! आणि तेंच स्वरूप थोडें सौम्य होण्यारोबर आम्हास परमावधीचा आनंद होतो!

 शहाणे लोक या दोन्ही स्थितींच्या पलीकडे जाण्याची इच्छा करितात. इंद्रियांस भासमान होणाऱ्या पदार्थसृष्टीचे खरे स्वरूप त्यांस ठाऊक असते. इंद्रियद्वारा प्राप्त होणारी सुखदुःखें चिरस्थायी नाहीत ही गोष्ट ते कधीहि विसरत नाहात. श्रीमंत लोक चैनीच्या नव्या नव्या तऱ्हा काढण्यासाठी केवढी काळजी वाहतात, हे आपणास ठाऊकच असेल ! आज ज्या पदार्थाने त्यास सुख झालेस वाटते, तोच पदार्थ उद्यां शिळा आणि बेचव होतो! चैनीच्या नव्या नव्या तऱ्हा रोजच्या रोज किती उत्पन्न होतात त्या पहा, म्हणजे श्रीमंतांना आपण सुखी आहो अस भासविण्यास केवढी खटपट करावी लागते. याचा तह्मांस अंदाज होईल. बाकीच्या लोकांत बहुधा मेषवृत्तीचे लोक फार. आघाडी, मेंढरूं खाड्यांत पडल्याबरोबर बाकीची मेंढरे आपण होऊन त्यांत उड्या घेतात! त्याचप्रमाणे एखाद्या बड्या धेंडाने काही गोष्ट केली की इतर त्याचे अनुकरण करूं लागतात. आपण काय करतो याचेंहि त्या बिचाऱ्यांस भान नसतें. जगांतील सुखदु:खांच्या कल्पनात