पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आह्मां दोघांमधील अंतर पूर्वीच्या इतकेंच. आपण सदा सुखी असावें व दुःखाने आपल्या आसमंतात् कोठे राहूं नये अशी आपली इच्छा आहे. या इच्छेने प्रेरित होऊन आह्मी आंधळ्यासारखे फिरत आहों. मध्यंतरी कोठे सुखाचा भास होऊन त्याला मिठी मारावयास जावें, तो कांटेरी झाडे हातांस लागतात ! आज अनंतकाल हे जग असेंच चालले आहे. मित्रांनो, आपण आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यक्रमाचा विचार केला तर आपणांस निरामय सुखाची प्राप्ति एक क्षणभरहि कधी झाली नाही असें आपणांस दिसून येईल. जी गोष्ट आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यांत प्राप्त झाली नाही, ती राहिलेल्या अवधींत प्राप्त होईल, अशी हमी कोणी दिली आहे काय ? या मृगजलामागे धावतां धावतां आपली तहान मात्र अधिक वाढत आहे.

 पूर्वी सोलन या नांवाचा एक तत्ववेत्ता होऊन गेला. त्याला क्रिसस राजा एकदां ह्मणाला, “साऱ्या जगांत आशियामायनर हीच सुखभूमि आहे.” सोलनने विचारले, “महाराज, या सुखभूमीत अत्यंत सुखी कोण आहे ?" राजा ह्मणाला, “मी." यावर सोलन ह्मणाला, “ महाराज, आपल्या शिल्लक आयुष्यांत काय प्रकार घडतील हे कोणी सांगावें ?" या गोष्टीला काही वर्षे लोटल्यानंतर इराणी लोकांनी क्रिससवर स्वारी करून एका लढाईत त्यास पकडलें, व त्यास जिवंत जाळण्याची तयारी केली. आतां लांकडांस आग लावणार इतक्यांत त्या बिचाऱ्या राजाला सोलनच्या ह्मणण्याची आठवण होऊन तो 'सोलन सोलन' झणून ओरडूं लागला. 'सोलन कोण ? ' ह्मणून इराणच्या बादशहाने प्रश्न विचारल्यावरून क्रीससने सर्व हकीगत त्याला सांगितली. तेव्हां बादशहाला दया येऊन त्यानें क्रिससला मुक्त केले.

 आपणा सर्वांची गोष्ट अशीच आहे. इंद्रियजन्यसुखाच्या मागे लागल्या सृष्टीच्या कायद्यांचे आपण दासानुदास बनलो आहो. सुख जवळ येतेसे वाटते तो एखादा कायदा जागृत होऊन आह्मांस एका लत्ताप्रहराने दूर झुगारून देतो ;पण त्याने सावध न होतां आह्मी पुन्हां धांवपळ करूं लागतो. आमचा मान कितीहि निराशाजनक असली तरी तींतहि कोठे तरी आशेची जागा आम्ही शोधीत असतो. या आशेने आम्ही पूर्ण वेडे बनलो आहो. आम्हाला सुखाची प्राप्ति होईल, ही आशा आह्मांस अद्यापिहि सोडून जात नाही.

 हिंदस्थानांत एक मोठा राजा पूर्वकाली होऊन गेला. त्याला एका सत्पुरुषाने विचारिलें, “ राजा, जगांत आश्चर्यकारक गोष्ट कोणती : " राजाने उत्तर दिले