पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अनुभवाचा मार्ग

 आपणांस ज्ञानप्राप्ति व्हावी असें ज्यास वाटत असेल, त्याने शम आणि दम है गुण अंगी आणण्यासाठी मनापासून प्रयत्न केला पाहिजे. शम आणि दम हे जरी दोन निरनिराळे गुण सांगितले आहेत, तरी त्यांचा अभ्यास एकत्र करणे श्रेयस्कर आहे. शम-दम याचा अर्थ इंद्रियांना आपापल्या गोलकांबाहेर जाऊं न देणे असा आहे. आतां येथे इंद्रिय ह्मणजे काय याचा अर्थ न समजण्याजोगा आहे, यासाठी प्रथम त्याचा अर्थ सांगतो. हे माझे डोळे पहा. हे आपणांस बाहेरून दिसतात व मीहि या डोळ्यांनी पाहतो; परंतु हे बाहेर दिसणारे डोळे, हे खरें इंद्रिय नव्हे. हे साधन अथवा उपकरण आहे. अंतस्थ गोलकाचा हा बाहेरील दरवाजा आहे. गोलक आपल्या जाग्यावर नसेल तर हे बाह्य डोळे असूनहि मला काही दिसणार नाही. तसेंच हे बाहेरील उपकरण आणि गोलक आपापल्या जागी असून त्यांना मनाची मदत न मिळाली तरीसुद्धां दृष्टीने होणारे वस्तुज्ञान मला होणार नाही. एखादे वेळी आपले मन काही विशेष विचारांत गुंतलें असतां आपणांसमोरून हत्ती गेला तरी आपणांस दिसत नाही, अशा प्रकारचा अनुभव आपणा सर्वांस आहेच. मनाची मदत गोलकास व गोलकाची असल्यावांचून, पाहणे ही क्रिया होऊ शकत नाही. याचप्रमाणे आपण जी जी क्रिया करतो तिची गोष्टहि अशीच आहे. प्रत्येक क्रियेंत या त्रयीची मदत अवश्य असलीच पाहिजे. बाहेरील अथवा जड इंद्रिय, त्याचा अंतस्थ गोलक आणि मन ही आपापल्या जागी असल्याशिवाय कोणत्याहि क्रिया करणे आपणांस शक्य नाही. अशा रीतीने आपल्या मनाची क्रिया दोन उपकरणांनी चालू असते. यांत एक उपकरण बाह्य असते व दुसरें अंतस्थ असते. आपले मन या अंतस्थ व बहिरिंद्रियाच्याद्वारे येऊन बाहेरील वस्तु पाहूं लागले ह्मणजे त्या वस्तूंतच गुंतून राहते; परंतु डोळे मिटून आपण विचार करू लागलों की मनाची बाह्यक्रिया थांबून ते अंतर्मुख होते. यावेळी बाहेरील वस्तूंकडून त्यास चलन मिळत नसल्यामुळे त्याचे कार्य आंतल्याआंत सुरू असते. डोळे मिटल्यानंतर बाहेरील वस्तूंचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही तरी त्यांचे चित्र इंद्रियद्वारा मन:पटावर उमटलेलें असतें व मनास चलन देऊन त्याची क्रिया ते थांबू देत नाही. यामुळे मन हे सदोदित कार्य करणारे आहे असे आपणांस दिसून येते. मी आपणाकडे पाहून बोलतों, त्यावेळी अंतस्थ गोलक आणि बहिरिंद्रिय अथवा गोलकाचे बाह्य उप