पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१७९

करूं शकते. आपण अमर्याद असल्यामुळे अमर्याद होऊन अमर्यादाला ओळखावें हेच आपणांस योग्य आहे. परमेश्वराच्या पूजनाचा खरा मार्ग हाच आहे. या पूजनाचा स्वतःच्या ठिकाणी प्रत्यय घेणाराची स्थिति वर्णनातीत आहे. ती व्यक्त करण्याचे सामर्थ्य भाषेत नाही. 'यतो वाचो निवर्तते अप्राप्य मनसासह' अशी ही स्थिति आहे; परंतु ही प्राप्त करून घेणेहि तितकेंच कठीण आहे. 'वाचा वदे परी करणे कठीण । इंद्रियां आधीन झालो देवा ॥' असें ह्मणून अश्रुपात करण्याची पाळी येते. तोंडाने मोठाल्या गोष्टी मी सांगत असतो, तत्वज्ञानाचा झरा माझ्या मुखाने वाहत असतो आणि इतक्यांत कांहीं तरी क्षुल्लक कारणावरून माझा क्रोध अनावर होतो, अहंकार उच्छृखल होतो. माझ्यावांचून-या लहानशा देहांत अनुभवास येणाऱ्या अहंकारी चैतन्यावांचून-जगांत दुसरा पदार्थच मला दिसेनासा होतो. त्या वेळी मी केवळ चैतन्य आहे, मी निःसीम आहे, हा सर्व माझाच खेळ आहे, मी मुक्त आहे इत्यादि सर्व कल्पना पार मावळून जातात.

 खरा पूजाविधि हा असिधाराव्रताइतका तीव्र आणि तुटलेल्या कड्यासारखा चढण्यास कठीण असा मार्ग आहे. आजपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी अनेक प्रकारे ही गोष्ट आह्मांस पुनःपुनः बजावून सांगितली आहे. 'काम क्रोध आड पडले पर्वत । राहिला अनंत पलीकडे । नुल्लंघवे मज न सांपडे वाट । दुस्तर हा घाट वैरियांचा ॥' असे उद्गार अनेक महात्म्यांनी जागोजाग काढिले आहेत. आपल्या मार्गातील भीतीची स्थले संतांनी याप्रमाणे निदर्शित करून ठेविली आहेत. या खुणांचा योग्य उपयोग करून घेणे हे आपणाकडे आहे. 'उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ' असें उपनिषद्वचन आहे. हा पहाड अत्यंत दुर्गम आहे खरा; परंतु याच्या पलीकडे असलेले स्वानंदसाम्राज्य आपणास हवे असेल तर हा चढण्यावांचून दुसरी तोड नाही. याच्या भीतीने आमचें अनंत वैभव आह्मी गमावू काय ? नाही. खचित नाही. आम्ही त्रैलोक्यविजयी वीर आहों. जो जों अडचणी अधिक तों तो आमचे धैर्यहि अधिक होऊन हा पहाड शेवटी आह्मी खचित पादाक्रांत करूं. दैत्यांचे आणि देवांचेहि धनी होण्याची आमची योग्यता आहे. मनुष्याची वास्तविक योग्यता अशी असतां तो दीनवाणा होत्साता दारोदार भीक मागत फिरतो, याचा बोल कोणाकडे आहे बरें ! अमृताच्या शोधासाठी निघालेल्या मनुष्याच्या तोंडांत विष पडावें ही नियति आहे असें तुह्मांस वाटते काय ? खऱ्या दिलाने शोध मात्र करा, मग अमृताचा जिवंत झरा तुह्मांजवळच तुह्मांस आढळून येईल. 'सर्व धर्मान् परि