पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

संहारकर्ता काल आहे तसेंच चिरंतन वास करणारें चैतन्यहि तोच आहे. पारध्याला भिऊन ससे जसे रानोमाळ पळतात, तसे आपण त्याच्या उग्ररूपास भिऊन इतस्ततः पळू लागतों व एखाद्या झाडाच्या ढोलीचा क्षणभर आश्रय मिळाला तर आपला जीव वांचला ह्मणून स्वत:स धन्य मानून घेतो. त्याचे उग्ररूप कोठेहि थोडें प्रकट झाल्याबरोबर सारे जग पळत सुटते. परंतु जगाच्या अंतापर्यंतहि आपण पळालों तरी जाणार कोठे ? मी काशीला गेलों असतां एक वेळ एका बाजूस तलाव आणि दुसऱ्या बाजूस उंच भिंत अशा रस्त्याने जाण्याचा मला प्रसंग आला. त्याठिकाणी कित्येक माकडें बसली होती. काशींतली माकडें चांगली गलेलठ्ठ आणि खोडकर असून मनुष्याचा रस्ता अडविण्याचे कधी कधी त्यांच्या मनांत येते. मी या रस्त्याने चाललों असतां कित्येक माकडे माझ्या भोंवतीं जमली. कित्येकांनी माझ्या पायांस विळखा घातला व कित्येक तर चावूहि लागली. त्यांना कसेबसें दूर करून मी झपाट्याने पळत सुटलों; परंतु त्यांचे चापल्य माझ्याहून अधिक असल्यामुळे त्यांनी मला पुन्हां गांठले. मी पुन्हां पळत सुटणार, इतक्यांत समोरून येणारा एक गहस्थ ओरडून ह्मणाला 'त्यांना तोंड द्या. पळू नका.' मीहि ताबडतोब मागे वळून धिटाईने त्यांजकडे पाहिले तेव्हां मागे पाय घेत घेत ती पळून गेली. आपल्या आयुष्यांत अडचणीचे असे अनेक प्रसंग आपणांवर येतात. व त्यावेळी आपण पळू लागतो. परंतु पळून त्यातून आपली सुटका होणे शक्य नाही. त्या प्रसंगांना तोंड देणे हेच इष्ट आहे. अनेक आपत्तींवर जय मिळविल्यावांचून मुक्तीचा मार्ग खुला होणार नाही. आपण पळू लागलों तर अधिकाधिक बंधनांत मात्र पडूं. आपल्या भेकडपणामुळे विपत्तीस अधिक अवसान मात्र चढते. भित्र्याला जगांत कोठेहि यशप्राप्ति होणार "नहीं जो खारसे (कांटा) डरते वोहि उस गुल (फूल) को पात है . हिंदी साधूचें ह्मणणे अत्यंत अर्थपूर्ण आहे. भय, दुःख आणि अज्ञान हात करण्याची तयारी असल्यावांचून ती आपणांपासून दूर होणार

 ज्या मृत्यूचे नुसतें नांव घेतल्याबरोबर आपण चळचळा का स्वरूप तरी काय आहे ? ही भीति कोठून उत्पन्न झाली? परमात्म्यानेच बागुलबोवाचे सोंग घेतले आहे. या बाहेरील घोंगडीच्या आंत आपण आपली दृष्टि घातली पाहिजे. जगांतील भयांपासून आपण पळून जाऊं लागलों ह्मणजे तीहि आपला एकसारखा पाठलाग करीत सुटतात आणि आपण त्यामुळे परमात्म्याच्या दर्शनसुखास मात्र अंतरतो. जगांत सखाची आणि समृद्धीची आराधना करणारे