पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१४९

विवेचन पूर्वी एकवार केलेच आहे. एक कर्म एखाद्या परिस्थितीस अनुरूप व विहित असले, तरी तेंच कर्म परिस्थिति बदलल्याबरोबर अननुरूप व अविहित होते. तसेच विशिष्ट परिस्थितीत एखादें कर्म निःस्वार्थी असले तरी परिस्थिति बदलली तर तेच कर्म स्वार्थी होण्याचा संभव असतो.

 अमुक एक कर्म स्वार्थी व अमुक दुसरें नि:स्वार्थी असें निश्चयाने ठरवितां येणें शक्य नाहीं; त्या अर्थी अशा कर्माची सर्वसामान्य व्याख्या सांगितली आहे. देश, काल आणि परिस्थिति यांस अनुसरून विहित कर्म कोणते आणि अविहित कोणतें, हे ज्याचें त्यानेच ठरविले पाहिजे. एखाद्या देशांत अमुक एक प्रकारची वागणूक नीतिसंमत समजली जाते परंतु दुसऱ्या देशांत निराळ्या परिस्थितीमुळे तीच वर्तणूक नीतिबाह्य ठरण्याचा संभव आहे. सर्व धडपडीचा-सर्व कर्माचा-अंतिम हेतु मुक्ति हा असून अत्यंत नि:स्वार्थी कर्मे करणे हाच मोक्षाचा मार्ग होय, इतकेंच तात्विकदृष्टया सांगणे शक्य आहे. अत्यंत नि:स्वार्थी असें प्रत्येक कर्म, असा प्रत्येक विचार आणि शब्द आपणांस मोक्षाकडे नेतो आणि ह्मणूनच तो नीतिवर्धक. प्रत्येक धर्मात आणि प्रत्येक नीतिग्रंथांतील विवेचनांत नीतीची हीच व्याख्या लागू पडते असे आपणांस आढळून येईल. कित्येक ग्रंथांत नीति ही परमेश्वराची आज्ञा आहे, असे प्रतिपादन केले आहे. मनुष्याने अमुक एक कर्म कां करावें अथवा अमुक एक कर्म कां करूं नये अशा प्रश्नांस 'परमेश्वराची आज्ञा ह्मणून' इतकेंच उत्तर आपणांस मिळेल. नीतिविषयक कल्पनांच्या उत्पत्तीचें मूलस्थान कोणतेंहि असले तरी त्यांच्या पोटी नि:स्वार्थ हेच तत्व गोवले असल्याचे आपणांस आढळून येईल. नीतिदृष्टया अथवा धर्मदृष्टया या सिद्धांताचा उच्चपणा इतका उघड असतां 'तूं स्वत:ला विसर' असें ह्मटल्याबरोबर कित्येक लोक गर्भगळित होतात, हे आश्चर्य नव्हे काय? एखाद्याने केवळ स्वत:साठी असे कोणतेंहि कर्म करावयाचे सोडून दिले, स्वतःबद्दल तो अक्षरहि उच्चारीनासा झाला अथवा स्वतःबद्दल काही विचारहि त्याच्या मनांत येईनासा झाला तर अशा मनुष्यांत 'मी' आणि 'माझें' यांचे वास्तव्य कोठे आढळेल ? किंबहुना, 'तूं कोण ?' असा प्रश्न आपण त्या मनुष्यास केला तर तो स्वतः तरी या प्रश्नाचे काय उत्तर देईल ? स्वतःबद्दल यत्किंचित् तरी विचार शिल्लक असल्याशिवाय 'मी' आणि 'माझें' या भावनेची उत्पत्ति होणेच शक्य नाही. मग स्वतःबद्दलचा विचारहि ज्याच्या चित्तांतून लुप्त झाला आहे, स्वतःबद्दलची ज्याची भावना विश्वभावाशी एकरूप झाली आहे, अशा मनुष्याच्या चित्तांतून