पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१३३

पैकी एखादाच त्यांत यश मिळवितो. 'मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः॥' अशी वस्तुस्थिति आहे. कल्पनातीत होण्यास आमच्या तत्ववेत्त्यांनी दोन मार्ग सांगितले आहेत. एक "नेति' आणि एक 'इति.' पहिला मार्ग निषेधरूप असून दुसरा विधिरूप आहे. यांपैकी पहिला निषेधरूप मार्ग अत्यंत दुर्गम आहे. अद्वितीय मनस्थिति आणि प्रचंड इच्छाशक्ति ही ज्यांस प्राप्त झाली असतील, त्यांनाच त्या मार्गात पाऊल टाकणे शक्य आहे. कोणतीहि सुखेच्छा नुसती उत्पन्न झाल्याबरोबर हे ह्मणतात, 'जा, तुझी मला जरूर नाही; ' आणि त्यांचे मन व शरीर त्यांची आज्ञा अक्षरश: पाळितात. पण इतक्या प्रचंड शक्तीचे लोक कितीसे असणार ? असे लोक क्वचितच असतील. यासाठी प्रायः सर्व मनुष्ये दुसऱ्या मार्गाचाच स्वीकार करितात. जगांतील सर्व बंधने पाहून त्यांजबद्दल विचार करून आणि त्याच बंधनांचा उपयोग स्वतःस करून घेऊन ते बंधनमुक्त होतात. कांट्याने कांटा काढून शेवटी जसे दोन्ही कांटे फेंकून द्यावयाचे, त्याप्रमाणे एक प्रकारच्या बंधनांनी दुसऱ्या प्रकारची बंधनें तोडून शेवटी दोहोंतूनहि सुटावयाचे. हा मार्गहि वस्तुतः त्यागाचाच आहे. त्याचेंहि पर्यवसान शेवटी 'नेति' या मार्गातच होते; पण ते फार हळू हळू होत असल्यामुळे फारसे कष्टप्रद होत नाही. जगांतील वस्तूंकडे पाहून, त्यांजबद्दल विचार करून, त्यांचा उपभोग घेऊन आणि त्यांजपासून प्राप्त होणाऱ्या सुखाची खरी योग्यता काय आहे, याचा अनुभव घेत घेत त्यांजपासून हळू हळू मनास परावृत्त करावयाचे असा हा 'इती'चा मार्ग आहे. पहिला मार्ग विवेकप्रधान असून दुसरा कर्मयोगाचा आणि अनुभवप्रधान आहे. पहिल्या मार्गाला ज्ञानयोग असेंहि नांव आहे. यांत पूर्ण विवेकाने कर्मसंन्यास करावयाचा असतो. ह्मणजे कोणतेंहि कर्म करावयाचें माहीं असा बुद्धीचा निश्चय विवेकानें करावयाचा. दुसऱ्या मार्गात कोणतेंहि कर्म करणे सोडावयाचे नसते. विश्वांतील प्रत्येक प्राण्याला कोणत्याना कोणत्या प्रकारचे तरी कर्म करावेच लागते. ज्यांचे मन स्वतःच्या ठिकाणींच पूर्ण संतुष्ट असते त्यांची मात्र गोष्ट निराळी आहे. आत्मज्ञानाशिवाय त्यांना दु-सया कशाचीहि वासना नसते. यामुळे स्वस्वरूप सोडून त्यांचे मन बाह्य जगांत कधीहि भटकत नाही. बाह्य वस्तूंपैकी कशाचीहि अपेक्षा उरली नसल्यामुळे ज्यांची बुद्धि अंतर्मुखता कधीहि सोडीत नाहीं अशा पुरुषांस मात्र कोणत्याहि कर्माचा अवलंब करण्याचे कारण नाही.