पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

अनंत सुखकर वस्तु भरल्या आहेत, तेथें अनंत जीवांची वस्ती आहे, तेथे अनंत प्रकारचे कायदे, अनंत राष्ट्र आणि अनंत संस्कृती आहेत; आणि हे अनंत अस्तित्व सगळे आपल्या विश्वाच्या बाहेर आहे. यावरून आपल्या विश्वाच्या बाहेर आणखी किती विस्तार आहे याची काही अंशी तरी तुह्मांस कल्पना होईल; आणि येवढा मोठा विस्तार आपल्या स्वतःच्या अनंतत्वाचा एक लहानसा भाग आहे.

 जर आपणांस खरें स्वातंत्र्य-मुक्ति-मिळवावयाची असेल तर या विश्वांत कोंडून घेऊन ती मिळणें नाही. ती मुक्ति या दृश्य विश्वात नाहीं; अगर ती अदृश्य स्वर्गातही नाही. तसेच ज्या ज्या ठिकाणी आपल्या कल्पनेची धांव पोहोचू शकते, अशा कोणत्याहि ठिकाणी जाऊन मुक्ति मिळणार नाही. तुह्मी कसल्याहि प्रकारच्या स्वर्गाची अथवा दुसऱ्या एखाद्या लोकाची कल्पना केली. तरी जेथे आपल्या कल्पनेस अवसर आहे, ती जागा आपल्या विश्वांतच अंतभूत होणार; आणि विश्व तर देश-काल-निमित्त या रेषात्रयीने बद्ध आहे. आमच्या या जगाहून आणखी काही निराळ्याच प्रकारची जगें असूं शकतील; तेथे येथल्याहून कांहीं अधिक सुखकर वस्तु असतील; परंतु जोपर्यंत त्यांचे अस्तित्व विश्वाबाहेर नाही, जोपर्यंत त्यांनी देश-काल-निमित्त ही त्रयी ओलांडली नाही, तोपर्यंत ती विश्वाच्या कायद्यांनी बांधलेली राहणारच. यासाठी मुक्तीची वाट या विश्वाबाहेर जाऊन शोधिली पाहिजे. ह्मणून विश्व जेथे संपतें तेथेच खऱ्या धर्ममागास आरंभ होतो. जोपर्यंत जीविततृष्णा आम्हास सोडून गेली नाही, आणि जोपर्यंत या क्षुद्र सुखांच्या कल्पनेने आपण लाळ घोटित आहों, तोपर्यंत मुक्तीचा मार्ग स्वप्नांतहि दिसण्याची आशा नको. यावरून हे नि:संशय सिद्ध होतें की मानवी जीविताचा खरा हेतु जी मुक्ति ती मिळण्याकरितां आपणांस, या विश्वाचा, या जगाचा, या स्वर्गकल्पनेचा, या देहाचा, या मनाचा, या चित्ताचा आणि जें जें ह्मणून मर्यादित असेल त्याचा सर्वथा त्याग केला पाहिजे. ज्या क्षणी इंद्रियजन्यसुखाची ही आसक्ति नाहीशी होईल, त्याच क्षणी मुक्ति आपणांस माळ घालील. ज्या शृंखलांनी सध्या आपण बद्ध झालो आहो. त्या तोडण्याचा मार्ग एकच. कल्पनेने जेथें प्रवेश करतां येतो त्याचा त्याग करा, कल्पनातीत व्हा, ह्मणजे तुह्मी मुक्तच आहां.

 'कल्पनातीत व्हा' हे ह्मणणे सोपे आहे; पण करणे अत्यंत कठीण आहे.हजारों मनुष्यांपैकी एखादा त्या मार्गास लागतो, आणि अशा हजारों मार्गस्थां