पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

सांगितलेली स्थिति प्राप्त करून घेण्याची आपली इच्छा असली तर तसे करण्यास आपण ताबडतोब आरंभ केला पाहिजे. आरंभ करण्यास कांहीं विशिष्ट परिस्थितीची अपेक्षा नाही. कोणत्याहि स्थितीत तुझी आरंभ केला आणि निश्चयाने चालला तर तुह्मांस अलिप्ततेची स्थिति प्राप्त होईलच होईल; आणि पूर्ण अलिप्तता प्राप्त होऊन तुमचा अहंकार निखालस मावळला ह्मणजे जें जग आज तुह्मांस पापमय दिसत आहे तेंच जग केवळ स्वर्ग आहे, आणि त्यांत पापाचा अंशहि नाही असें तुह्मी ह्मणाल. तेथे वाहणारा वायूहि शीतळ आणि पुण्यकारक आहे असें तुह्मांस वाढू लागेल. कर्मयोगाचें हेच ध्येय-हेंच साध्य-आहे आणि चालू जीविताची हीच पूर्णावस्था आहे.

प्राचीन आर्यतत्वज्ञांनी अनेक प्रकारचे योग सांगितले आहेत; तथापि प्रकार भिन्न असले तरी सर्वांचे साध्य एकच आहे. मनुष्यमात्रास पूर्णत्वास नेणे हे सर्व योगांचे ध्येय आहे. आपणांस या मार्गापैकी कोणता पसंत असेल त्या मार्गाने निश्चयाने आणि अट्टाहासाने आपण गेले पाहिजे. कोणत्याहि योगाचे रहस्य झाले तरी ते नुसते समजण्यांत तात्पर्य नाही. 'हे मला समजले ' असें नुसतें तोंडाने ह्मणून तुह्मांस कांही खरी प्राप्ति व्हावयाची नाही. तुह्मांस उच्चतम स्थिति प्राप्त करून घेणे असेल तर तुह्मीं समजून उमजले पाहिजे. उमजून त्याचा अभ्यास दृढ निश्चयाने आणि अट्टाहासाने केला पाहिजे. श्रवण, मनन आणि अभ्यास या तीन पायऱ्यांचा आश्रय करून तुह्मीं कोणताहि मार्ग निश्चयाने आक्रमिला पाहिजे. कोणताहि योग झाला तरी त्याच्या सिद्धीकरितां निश्चय आणि अभ्यास ही सतत पाहिजेत. तत्वांचें प्रथम श्रवण करून नंतर त्यांचे सदैव चिंतन केले पाहिजे. प्रथम प्रथम काही प्रमेये फार अवघडशी वाटली तरी सतत श्रवण, मनन आणि निदिध्यास या त्रयीच्या साहाय्याने ता आपोआप समजं लागतील. एकाच वेळी सर्व प्रमेयें आपणांस समजतील अस नाही. वस्तुतः तुह्मीच सर्वज्ञ आहां, यामुळे कोणीहि कोणास काही नवे शिकवू शकत नाही. या गोष्टी ज्याच्या त्यानेच शिकावयाच्या आहेत. फार झाल तर बाह्य जगाकडून कांही सूचना तुह्मांस मिळतील. त्यामुळे तुमच्या अंतरात्म्यात जागृति येऊन तो अज्ञानाचा पडदा टाकन देण्याचा प्रयत्न करितो. अशी वस्तुस्थिति असल्यामुळे बुद्धि सदैव जागृत ठेवन बाह्येंद्रियद्वारा येणाऱ्या सर्व सूचनांचा योग्य उपयोग करणे हे आपले कर्तव्य आपणच केले पाहिजे. ज्ञान ही बाहेरून येणारी वस्तु नसून अनुभवाने ती आपल्याच ठिकाणी पहावयाची