पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

आघाताने स्पष्ट न निघतां सूक्ष्म निघतो. पहिल्या वाद्यापासून दुसरें वाद्य च अंतरावर असेल तर हा ध्वनि अत्यंत सूक्ष्म होईल हे उघड आहे; तसेंच माझ्या विचारतरंगांनी दुसऱ्यांच्या मनावर उमटणारे तरंग कमी अथवा अधिक स्पष्ट उमटणे हें, अंतरावर व इतर परिस्थितीवर अवलंबून राहील, हेहि उघड आहे. यावरून आपल्या मनावर बाह्य तरंगांचा परिणाम कधी सूक्ष्म, तर कधी व्यक्त, परंतु निश्चितपणे होत असतो एवढी गोष्ट सिद्ध होते. माझ्या मनांत एखादें वाईट कर्म करण्याचा विचार उद्भवला तर या विश्वांत जी मनें माझ्याशी सदृश अशा स्थितीत असतील त्यांजवर त्या विचारतरंगांचा परिणाम घडणे शक्य आहे. त्याचप्रमाणे कांही शुभ कर्म आचरावें अशी इच्छा माझ्या मनांत उद्भवली तर तीमुळे दुसऱ्या प्रकाराचे तरंग उद्भवतात व सदृश स्थितींतील मनांवर आघात करितात. हा तरंगाघात किती सूक्ष्म अथवा किती जोराचा होईल हे पहिल्या मनाच्या शक्तीवर अवलंबून आहे. दुर्वळ मनापासून निघणारे तरंग दुर्बळच असणार व त्यांच्या आघाताने होणारा परिणामही अत्यंत सूक्ष्म होईल हे उघड आहे. तसेच स्वत:च्या चैतन्यशक्तीची पूर्ण ओळख होऊन जे मन अत्यंत शक्तिमान् झाले असेल त्यांतून उद्भूत होणारे तरंग अति सामर्थ्यवान् असलेच पाहिजेत.

 ज्याप्रमाणे ध्वनीचे तरंग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, त्याचप्रमाणे प्रकाशकिरणहि एकापासून दुसऱ्या स्थली जातात. कमी अधिक अंतराच्या मानाने प्रकाशकिरण पोहोंचावयास कमी अथवा अधिक वेळ लागतो. कित्येक ताऱ्यांचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास कित्येक लक्ष वर्षे लागतात. ज्यांचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर अद्यापि पोहोंचला नाही, व त्यामुळे जे अद्यापि आपल्या दृष्टिपथांत आले नाहीत असे तारे विश्वांत आहेत असें ज्योतिषशास्त्राचे मत आहे. त्याचप्रमाणे एका मनावर उठणारे विचारतरंग सदृश स्थितीतील मन सांपडून त्यावर प्रतितरंग उमटवीपर्यंत कदाचित् कित्येक लक्ष वर्षेहि उलटून जाण्याचा संभव आहे. यावरून आपल्या भोवती असलेले वातावरण चांगल्या व वाईट अशा दोन्ही प्रकारच्या विचारतरंगांनी भरून गेलेल असण्याचा संभव आहे. प्रत्येक मेंदूंतून निघणारा तरंग याप्रमाणे हिंडत असतो आणि योग्य ठिकाण सांपडतांच तेथें शिरून बसतो. जे मन स्वतःच्या विचारतरंगांनी विशिष्ट स्थितीस प्राप्त झालेले असते ते आपल्याशी सदृश असणारे बाहेरील विचारतरंग ताबडतोब ग्रहण करिते. याकरितां कोणतीहि वाईट गोष्ट