पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१००

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


आणि वाढ ही मनुष्यजातीबरोवर आपोआपच झाली आहेत. ज्या कल्पनेला शब्द नाही अशी कल्पना अस्तित्वांतच आली नाही; तसेंच जे शब्द प्रचारांत आले ते कल्पनेवांचून आलेले नाहीत. कल्पना आणि शब्द यांचे अविभाज्य संमेलन झालेले आहे. यांस केव्हांहि विभक्त करता येणार नाही. कल्पना व्यक्त करण्याकरितां दोन प्रकारच्या चिन्हांचा उपयोग होतो. एक प्रकार ध्वनिचिन्हांचा, आणि दुसरा वर्णचिन्हांचा. जन्मापासून बहिरे आणि मुके अशा लोकांस ध्वनिचिन्हांचा काही उपयोग नाही. त्यांना ध्वनिचिन्हांहून निराळ्या चिन्हांचा उपयोग करावा लागतो. जो जो विचार मनात येतो त्याचे दृश्यचित्र मन:पटावर ताबडतोब उमटते. पर्वताचें, नदीचे अथवा दुसरें कसले तरी चित्र काढावयाचे एखाद्या चिताऱ्याच्या मनांत आले तर कागदाला त्याची कुंचली लागण्यापूर्वी तें सर्व चित्र पूर्णपणे त्याच्या चित्तपटावर प्रथम रंगविले जाते व नंतर त्याची नक्कल तो कागदावर काढितो. अशाप्रकारे मन:पटावर प्रत्येक विचाराचे दृश्य स्वरूप प्रथम चित्रित होते. या चित्राला आर्यतत्वज्ञांनी नाम-रूप अशी संज्ञा दिली आहे. ज्याप्रमाणे काही विशिष्ट मनुष्यांनी भाषा निर्माण केलेली नाही, त्याचप्रमाणे चिन्हेंहि कोणी निर्माण केलेली नाहीत. धर्मतत्वांचा प्रत्यक्ष आचार सुरू होतांच त्याबरोबर विशिष्ट चिन्हेंहि आपोआप प्रचारांत येत गेली. धर्माचे विशिष्ट आचार आणि देवळे, मशिदी वगैरे विशिष्ट जागा असण्याचे काय कारण आहे, असा प्रश्न अलीकडे अनेक लोक करितात. धर्मविचारांत तान्ह्या मुलांपेक्षा ज्यांची योग्यता अधिक नाही, अशा लोकांनाहि धर्मविषयक हवे ते प्रश्न विचारण्याची जणूं काय पूर्ण मुभा मिळाली आहे ! तथापि देवळांत जाऊन मूर्तीस नमस्कार करणाऱ्या अथवा प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या वर्तणुकीची, तसे न करण्यांत अभिमान बाळगणाऱ्या लोकांच्या वर्तणुकीशी सूक्ष्म तुलना केली तर त्यांजमधील फरक कळतो. देवळे व पूर्वी सांगितलेली चिन्हें यांच्या संबंधी ज्या विशिष्ट भावना मानवी मनोवृत्तीत अत्यंत संलग्न आहेत, त्या देवळात जाण्याबरोबर अथवा चिन्हदर्शनाबरोबर जागत होऊन त्यांचा परिणाम चित्तावर होतो. याकरितां अशाप्रकारच्या विशिष्ट चिन्हांचा त्याग करणे युक्त नाही. चिन्हांचा वास्तविक अर्थ समजून त्यांचा उपयोग करणे हाहि कर्मयोगाचाच एक भाग आहे.

 कर्मयोगशास्त्रांत महत्वाची अशी दुसरी अनेक अंगें अंतर्भूत होतात. विचार आणि उच्चार यांजमधील परस्पर संबंध काय आहेत व उच्चारांत ह्मणजे विचा