पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

९७


त्यांस वाटते. परंतु एखादा प्रश्न विचारून काही दिवस तुझी वाट पाहात बसलां तर एखादे दिवशी बोलण्याच्या ओघांत तुमच्या प्रश्नाचे उत्तर ते अशा प्रकारे देतील की अननुभूत अशी ज्ञानप्राप्ति आपणांस झाली असें तुह्मांला वाटेल. कर्माचें मुख्य रहस्य काय असा प्रश्न त्यांना मी एक वेळ केला. काही दिवसांनी ते सहज एकदां ह्मणाले, “साध्य आणि साधनें ही चित्तांत एकरूप झालेली असावी." याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी तुह्मीं कांहीं कार्य करीत असाल त्या वेळी साध्य आणि साधनें यांशिवाय इतर कोणत्याहि गोष्टीचा विचार करूं नका. साधनांनी साध्य सिद्ध होईपर्यंत मध्यंतरी जो वेळ जातो त्या वेळांत इतर भलत्याच गोष्टीचा विचार करूं नका. व्याधाच्या गोष्टींतील तात्पर्य हेच आहे. प्राप्तकर्तव्य उत्तम रीतीने पार पाडणे हीच परमेश्वराची पूजा करण्याचा उच्च मार्ग आहे. अशा रीतीने प्रत्येक कर्म ह्मणजे त्याचे पूजन, आणि त्याचे आज्ञापालन आहे अशी भावना पक्की झाली ह्मणजे ज्ञान आपोआप प्राप्त होऊ लागते. आपली परिस्थिति आणि आपला दर्जा यांस अनुरूप अशी जी प्राप्तकर्तव्ये असतील ती निष्काम मनानें-अलिप्तपणानें-पार पाडली म्हणजे अशा कर्मातून ज्ञान उदय पावू लागतें, व ज्ञानाने आत्म्यास मोक्ष मिळतो.

 ज्याच्या हृदयांत फलापेक्षा आहे, अशा मनुष्याच्या हातून आनंदी वृत्तीने कोणतेंहि काम होणे शक्यच नाही. जरा कोठे कांही अडचण आल्याचा भास झाला, की अशा मनुष्याचे डोके ठिकाणावर राहत नाही. यामुळे ज्ञानप्राप्तीचा प्रसंग आला तरी तो वाया जातो. ज्याला फलापेक्षा नाही त्याला सर्व कर्तव्ये सारख्याच योग्यतेची वाटतात. यामुळे प्रचंड उद्योग करीत असतांहि एखाद्या गुहेत राहिल्याप्रमाणे निःसीम शांतता त्याच्या हृदयांत वास करिते. यामुळेच त्याचे प्रत्येक कर्म ह्मणजे तीक्ष्ण हत्यारच होऊन बसते; व या हत्याराने स्वार्थ आणि इंद्रियसुखलोलुपता यांचा समूळ उच्छेद करून तो ज्ञानवान् होतो. 'यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्प वर्जिताः। ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः॥' अशी पंडिताची व्याख्या भगवान् श्रीकृष्णांनी केली आहे. स्वतःच्या ज्ञानाबद्दल घमेंड वाटणे हा मनुष्यजातीचा सामान्य स्वभाव आहे. यामुळे कोणतेंहि कर्तव्य प्राप्त झालें ह्मणजे तें कमी दर्जाचें असें आपणांस वाटते. परंतु कर्माची वाटणी योग्यतेनुरूपच झालेली असते, हा त्रिकालाबाधित सिद्धांत आपणांस ठाऊक नसतो. अथवा ठाऊक असला तरी 'मी मोठा' या भावनेने अंध झालेल्या मनुष्यास तो दिसत नाही. मोठेपणाच्या भावनेने मोह पावलेल्या बुद्धीला यास्वा. वि. ७