पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


खेरीज इतरांपैकी एकहि चेहरा माझ्या ध्यानात येत नाही. याचे कारण असें की माझें प्रेम ज्यावर जडलें त्या मनुष्याचा चेहरा माझ्या मनःपटावर पक्का कोरला गेला. ती प्रतिमा माझ्या चित्तांतून सहसा निघून जाऊं नये अशा रीतीने तेथे ती चित्रित झाली. बाकीचे शेंकडों चेहरे मी पाहिले, परंतु माझें मन त्यांविषयी आसक्त नसल्यामुळे त्या प्रतिमा माझ्या मनावर उमटल्या नाहीत; व त्या न उमटल्यामुळे त्यांचे स्मरण करणे मला अशक्य झाले. केवळ बाह्यदृष्टीने पाहिले तर माझ्या नेत्रांतील कनीनिकेवर सर्व चेहरे सारखेच चित्रित झाले होते. असे असतां त्यांपैकी एकच मला आठवतो आणि बाकीच्यांचें यत्किंचितहि स्मरण कां राहिले नाही ? याचे कारण असे की एकाशिवाय बाकीचे चेहरे मी कदाचित् पूर्वी कधीहि पाहिले नसल्यामुळे त्यांच्यासंबंधी माझ्या मनांत पूर्वग्रह असा कांहींच नव्हता. परंतु प्रेमाच्या मनुष्याची गोष्ट निराळी आहे. त्याला मी पूर्वी अनेक वेळां पाहिले असल्यामुळे त्याच्यासंबंधी कांहीं पूर्वग्रह माझ्या मनांत अगोदरच होते. त्यामुळे त्या विशिष्ट दिवशी त्याची प्रतिमा माझ्या चित्तांत शिरतांच तिचे जुने स्नेही तेथे आढळल्यामुळे ती तेथेच त्यांच्या सहवासास राहिल्यासारखी झाली. त्या मनुष्याबद्दल शेंकडों प्रकारच्या गोष्टी अनेक प्रसंगी माझ्या कानावरून गेल्या होत्या व शेंकडों मी माझ्या मनांत स्वतः तयार केल्या होत्या. हा सर्व कल्पनासमूह माझ्या चित्तांत निद्रित होता; व त्या दिवशी त्या मनुष्याच्या चेहऱ्याच्या प्रतिमेचा आघात माझ्या चित्तावर होतांच तो निद्रित कल्पनासमूह खडबडून जागा झाला, व त्याने या नव्या पाहुण्याचे प्रेमाने स्वागत केले. यावरून असे सिद्ध होते की, जी गोष्ट कोणत्या तरी कारणाने माझ्या मनांत घोळत राहते तिचा ठसा तेथें खोल उमटून राहतो व यत्किंचित् आघाताने जागत होतो.

 यासाठी प्रत्येक गोष्ट करतांना तूं ती अलिप्त चित्ताने कर. ती तुझ्या मनांत घोळित बसूं नको असा भगवान् श्रीकृष्णाचा उपदेश आहे. तुझी कर्मेद्रियें व ज्ञानेंद्रियें एकखारखी उद्योगरत असतां त्या उद्योगाचा ठसा आपल्या मनावर उमढू देऊ नको. आपण कोणाच्या घरी पाहुणे ह्मणून गेला तर तेथील वस्तूकडे ज्या बुद्धीने आपण पाहतो त्याच बुद्धीने या सृष्टीतील यच्चयावत् पदार्थांचे अवलोकन करावें. तूं एकसारखा उद्योग अवश्य कर; परंतु त्यांत लिप्त होऊ नको नसता उद्योग करणें हें बाधक नसून लिप्तपणा हा बाधक आहे. हे दृश्य जग आपल्या नित्य वास्तव्याचे ठिकाण नसून आपल्या प्रवासांतील मधल्या