पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

वाईट कामें अगदी सहजासहजी घडून येतात. पुढे पुढे तर या संस्कारांचें प्राबल्य इतके होते की एखादी गोष्ट वाईट आहे असे समजूनउमजूनहि तो मनुष्य ती गोष्ट करण्यास प्रवृत्त होतो. वाईट संस्कारांच्या प्राबल्यापुढे चांगल्या वृत्तीचा जोरच चालेनासा होतो. याचप्रमाणे मनाने चांगलें चिंतणाऱ्या आणि चांगली कामें करणाऱ्या मनुष्याचे चांगले संस्कार उत्तरोत्तर अधिक चांगली कामे त्याजकडून करवितात. चांगल्या संस्कारांनी त्याच्या दानतीचे स्वरूप इतकें पक्कें बनून गेलें असतें की एखादें वाईट कर्म करण्याचे त्याच्या क्षणभर मनांत आले तरी त्याचे शरीर तें कर्म करण्यास पुढे सरसावतच नाही. इतकी स्थिति झाली ह्मणजे मनुष्याची दानत पक्की झाली असे समजावें.

 आपले अवयव आपल्या पाठीखाली मिटून घेण्याची शक्ति कांसवाला असते. पाठीवर केवढेहि तडाके बसले तरी जसें तें कांसव निग्रहाने आपल्या अवयवांस बाहेर येऊ देत नाही, तसें ज्या मनुष्याचे आपल्या इंद्रियांवर स्वामित्व असतें तो मनुष्यहि कांसवासारख्या निग्रहाने आपल्या हातून कोणतेंहि वाईट कर्म घडू देत नाही. 'तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः । इंद्रियाणीद्वियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥' असें भगवान् श्रीकृष्णाचे वचन आहे. सदोदित सद्विचार ठेवून सत्क्रिया आचरल्याने उत्पन्न होणारे संस्कार बळावत जाऊन जी दानत बनते, तिच्या साहाय्याने इंद्रियनिग्रह करणे फार जड जात नाही. या ठिकाणी इंद्रिय शब्दाने केवळ दृश्य आणि जड इंद्रियांचा निर्देश केला आहे, असे समजू नये. कारण केवळ जड शरीर जाग्यावरून न हालवितांहि नित्य वाईट गोष्टींचें चिंतन केले तरी दानत बिघडावयास उशीर लागत नाही. यासाठी कमेंद्रियांबरोबरच ज्ञानेंद्रियांचाहि निरोध आवश्यक आहे. हा निरोध पक्का झाला ह्मणजे मनुष्य स्थितप्रज्ञ झाला असें ह्मणतां येईल; आणि स्थितप्रज्ञासच सत्याची भेट होते व तो द्वंद्वातीत होऊन अगदी सुरक्षित अशा जागी जाऊन बसतो. त्याच्या हातून कोणतेंहि वाईट कृत्य घडणेच अशक्य होते. जगातील अत्यंत दुष्ट अशा नरपशुंचा गराडा त्याच्या भोवती असला तरी त्याच्या दानतींत यत्किंचिंहि बदल होण्याची भीति नको. अशा प्रकारच्या स्थितीला ब्राह्मी स्थिति असें ह्मणतात. ही स्थिति एकदां प्राप्त झाली ह्मणजे पुन्हा कसल्याहि मोहांत न पडतां तो मनुष्य मुक्ताच्या स्थितीत प्रवेश करतो. सर्व योगाचे ध्येय ही मुक्तस्थिति प्राप्त करून घेण्याचे आहे. व प्रत्येकाने दाखविलेले मार्ग जरी निरनिरा दिसले तरी त्यांचे पर्यवसान एकाच ठिकाणी होते. ज्ञानयोगाने बुद्धाला अथवा