पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


 जगांत जें दुःख आढळतें तें नुसत्या शारीरिक मदतीने कधीहि नष्ट होणार नाही. सध्या जो मनुष्यस्वभाव आपण पाहतों तो सर्व बदलून जाईपर्यंत अनेक प्रकारच्या गरजा उद्भवणार आणि त्या न भागल्या ह्मणजे दुःखप्राप्ति ही होणारच; आणि नुसत्या शारीरिक मदतीने असल्या दुःखाची निवृत्ति कायमची होणार नाही. खऱ्या ज्ञानदानाने चित्तशुद्धि करणे हेच या रागावर रामबाण औषध आहे. 'चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती। व्याघ्रहि न खाती सर्प तया॥' अशी चित्तशुद्धीची महती संतांनी वर्णिली आहे. जगांतील सर्व पाप आणि दु:ख यांची उत्पत्ति अज्ञानापासून झाली आहे. खऱ्या ज्ञानप्राप्तीने ज्या दिवशी मनुष्यमात्रास आपल्या चैतन्यशक्तीची ओळख पटेल, आणि त्याच्यांत पूर्ण आत्मविश्वास निपजेल, त्या दिवशी मानवजाति पूर्ण सुखी होईल. त्याच्या अगोदर अशा स्थितीची आशाहि करूं नये. राष्ट्रांतील प्रत्येक घर सदावर्त झाले आणि प्रत्येक घराआड एक एक फुकट दवाखाना झाला तरी मानवजातीची आज आढळणारी दुःस्थिति नाहींशी होणार नाही. मनुष्यजातीचा आज दिसून येणारा स्वभाव अगदी बदलून जाईपर्यंत हीच स्थिति नित्य कायम राहणार.

 कर्म हे नित्य केलेच पाहिजे असें श्रीकृष्णांनी गीतेंत जागोजाग सांगितले आहे. 'कर्मणैवहि संसिद्धिमास्थिता जनकादयः।' असें भगवान् श्रीकृष्णाचे निश्चित मत आहे. आपल्या प्रत्येक कर्मापासून सुख आणि दु:ख यांची मिश्र उत्पत्ति होत असते. तुझी कोणतेंहि काम करा, त्यापासून कोणाला सुख आणि कोणाला दुःख ही होणारच. ज्यापासून कोणाला सुख नाही आणि कोणाला दु:ख नाहीं असें एकहि काम करणे शक्य नाही. प्रत्येक कर्माच्या पोटी सुख आणि दुःख यांची मिश्र संतति निपजत असते; आणि असें आहे तरी आम्हांस कर्म हे केलेच पाहिजे. जर कर्मापासून सुखदु:खाची उत्पत्ति होते तर आपण कर्मच करूं नये ह्मणजे सुखदुःखांच्या द्वंद्वांतून आपण मुक्त होऊ अस कोणास वाटेल तर तो मात्र त्याचा निवळ भ्रम होय. प्रत्येक कर्म ज्या मानाने सुष्ट अथवा दुष्ट असेल त्या मानाने त्यांतून सुखाची अथवा दु:खाची प्राप्ति होते. सत्कर्मापासून सुख आणि दुष्कर्मापासून दुःख निपजतें. तथापि दुःख हे जसे आत्म्याला बद्धक आहे तसेंच सुखहि बद्धकच आहे. सत्कर्माने सुख होते ही गोष्ट जरी अनुभवाची आहे तरी तें सुख कर्मापासून नवीन उत्पन्न झालेले नसतें. तर आपल्याच ठिकाणी असलेलें सुख सत्कर्मामुळे आपल्या अनुभवास येते, अशी वस्तुस्थिति आहे. सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते हा भ्रम आहे, आणि