पान:स्वरांत.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " असं वणवण भटकताना मन अतृप्तच राहिलं. दिदी, गेल्या सहा वर्षांत निवान्त मनानं पोटभर भातही खाल्ला नाही मी. कुणास ठाऊक, या जन्मी तरी ..."
 बोलताना तो मध्येच थांबला होता. आणि मग अचानक भरती यावी तसं बोलला होता-
 "परवा कलकत्त्याला शामली दिसली होती. काही क्षण असे येतात, की तनमन पेटून निघतं. वाटतं, सारं सोडून द्यावं. पुन्हा एकदा समाजाच्या चौकटीत स्वतःला झोकून द्यावं. पण सारे रस्ते माझ्यासाठी बंद आहेत. समोर आहे फक्त एकच रस्ता- "
 आणि एक दिवस बरीन् मरून पडला. अतृप्त ... असहायसा.
 क्रांतीच्या कल्पनेनं, नव्या राज्याच्या कल्पनेनं तिचंही मन इतके दिवस बेभानून जायचं.
 अलीकडे वाटायचं, सारं खोटं आहे.
फोल आहे. पण मनीषच्या मागे फरफटत जाण्याशिवाय दुसरा मार्ग कुठं होता?
 " इथली माणसं मेलेलीच जन्मतात रे ! त्यांची मनं रक्ताच्या रंगानी पेटतील असं वाटतं तुला ? "
 " चल सारं सोडून. पाटोलला जाऊ. शेती पाहू. मला एक घर हवं आहे. आणि एक इवलंसं ..." ती एक दिवस मनीषला म्हणाली होती. पण तिचे शब्द तोडीत मनीषनं कळवळून सांगितलं होतं, " रीना, प्लीज हळू बोल. सारे विचार मनात पुरून टाक. भिंतीनं जरी हे ऐकलं तरी आपली

८४ /स्वरांत