पान:स्वरांत.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्याचं भोळं रुपडं तिला खूप हवंसं वाटतं. हलक्या हातांनी ती त्याच्या अंगावर शाल घालते नि फुलं त्याच्या नाकाशी धरीत त्याच्या डोळ्यांवर ओठ टेकते. आणि त्याच्या कानात सांगत राहते,
 'अजित प्लीज ... माझं तुझ्यावर प्रेम बसलंय. चक्क प्रेम ! या फुलाच्या दाट गंधासारखं. आत्ता या क्षणी. शप्पथ......'

* *

८२ /स्वरांत