पान:स्वरांत.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्टेटस् ला जातात. नि रोशाचा नवरा इथेच एम. एस्. झालाय. शी! )
 (नुसताच स्मार्ट नि गोमटा. घरी तर काहीसुद्धा नाही म्हणे.)
 (बाकी रोशानं आई-बापांनी दिलेला नवरा पत्करलान.. हे काय कमी?)
 वगैरे वगैरे ...
 पपा डॉ. संचेतींना घेऊन डायस जवळ येताहेत.
 ' मीट माय डॉटर मिसेस् रोशन देसाई. ओ. नो. सॉरी मिसेस शिर्के ... मिसेस रोशन अजिस शिर्के ... हे डॉ. अजित शिर्के.'
 पपा बोलताना नको तिथे अडखळलेले असतात. ते अडखळणं तिला पुनः पुन्हा आठवावंसं वाटतं. मनाला छान वाटतं.
 तो शेजारी सावरून बसलाय.
 तिला त्याची दया येते. बिच्चारा! केव्हाचा एकटा एकटा बसलाय अन् तेही अवघडून.
 'बोअर झालात ? सुटात उकडत असेल नाही?'
 तो दचकून तिच्याकडे पाहतो.
 ती खूप गोड दिसतेय.
 'अं हं. आज बोअर होऊन कसं चालेल ?'
 तो खुलून बोलतो नि जरा ऐसपैस बसतो.
 त्याची किंचित् लालस नजर. ती एका एकी अंग चोरून

तुझियामाझ्यामध्ये पहाट झाली सेतू /७१