पान:स्वरांत.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




तुझियामाझ्यामध्ये पहाटच झाली सेतू

 सनईचे घरंगळते सूर.
 दगडी भिंतीवरून झेपावणाऱ्या बोगनवेलीच्या बटबटीत झुबक्यासारखे. रंगीत, तरीही निर्विकार. त्या सुरांसारखीच तीही. ती त्याच्या शेजारी बसलीय. हातात आईस्क्रीम प्लेट. चमचा- चमचा चाटत बसताना वेळ जरा बरा जातो. एरवी जिकडे तिकडे उडताहेत कारंजी, तेलकट नि ओशट शब्दांची.
 '... रोशन इज लकी ... नवरा रीअली फक्कड हं!'
 'देसाईसाहेब, जावई झकास मिळवलात'
 'मिसेस् देसाई, रोशा इतकी गोड दिसतेय. पोतंभर मिरच्या ओवाळून टाका तिच्यावरून.'
 'रोशन, नवरा क्यूऽऽट हं ! पण त्याच्या टोकदार मिशा सांभाळ बाई !
 या शब्दांच्या पाठीमागे आणखीनही खूपसे शब्द. ध्वनिविहीन. मनाच्या कंसातले.
 ( अगदी बेत्ताचाय नाही जावई ? देसाई दर दोन वर्षांनी

७० /स्वरांत