पान:स्वरांत.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आजोळ. तिथल्या नद्यांचे...भाताचे वर्णन करताना त्याचा चेहेरा फुलून जायचा. रॉबिन्द्रनाथ आणि बर्मनदा जणू त्याच्या घराअंगणातलेच असायचे.
 किती विषय नि किती शब्द. त्याने कधी तिच्या घरादाराविषयी विचारले नाही. तिलाही कधी त्याला हे विचारण्याची आठवण झाली नाही.
 प्रत्येक दिवस कसा तरतरीत! दिवसभर सेमिनार. त्यातल्या चर्चा. नंतरची संध्याकाळ अशी अनोखी. खळाळत्या मेघानेसारखी! सहा वाजता ती नकळत त्याची वाट पाहात पायऱ्यांवर उभी राही. आणि ती रेंगाळताना दिसली की तोही तिथे येई आणि म्हणे.
 'चलने काऽ'
 ...दोन दिवसांनी पुन्हा सुरू होईल रुटीन. धुमसणं... वैताग...बेचव प्रेम. ओंजळीत जपून ठेवलेले क्षण निसटून जावेत तशी ती व्याकुळते...
 'रबिन पाठवशील ना मला पत्र'
 ... कातर आवाजात ती त्याला विचारते.
 लहान मुलाची खोटीखोटी समजूत घालताना हसतात तसं तो हसतो आणि एकदम काहीसा गंभीर होतो.
 '...तुझ्या निरागस, कोवळ्या स्नेहानं मनावरची सारी जळमटं निघून गेली आहेत. मन कसं निर्मळ झालंय. तुझ्या सहवासात वाहून जाताना, प्रेयसी, पत्नी, बहीण या साऱ्या व्यवहारी नात्यापलीकडचा, आगळा स्नेहतंतू तुझ्यामाझ्यात निर्माण झाल्याची, विलक्षण आत जाणीव मला क्षणोक्षणी

पहाटनाते / ६७