पान:स्वरांत.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तिने वर पाहिले तर एक बंगालीबाबू उभा.
 शुभ्र धोतराचा सोगा झब्ब्याच्या खिशात कोंबत ओठांचा चंबू करीत बोलणारा. सावळासा रंग, बोचक नजर आणि धारदार नाक. रॉबिन् चौधुरी. तो कलकत्त्याच्या यूथ होस्टेलचा सेक्रेटरी होता. सेमिनारसाठी आलेला. ती काही बोलण्यापूर्वीच तो खाली बसला होता, ऐसपैस. नि तसाच गप्पाही मारल्या होत्या ऐसपैस.
 टिळक, टागोर. ॲना तर्खडकर, पगला घोडा नि एवं इंद्रजीत, नक्सलाईट, बांगला देशचें युद्ध...कितीतरी विषय गप्पात रंगून गेले होते. हरवलेला सूर अचानक गवसावा तशी तीही बडबडली होती. मुक्तपणे.
 बंगाली रंगभूमी इतकीच मराठी रंगभूमीही स्वयंभू, समृद्ध आणि प्रायोगिक आहे हे तिने भांडून पटवून दिले होते. मतकरींची प्रेमकहाणी...सुलतान...गार्बो...वेकेट कितीतरी जणांच्या साक्षी काढल्या होत्या.
 संध्याकाळचा कार्यक्रम मग आपोआपच ठरला. चाणक्यपुरीतल्या, वृक्षांनी झाकल्या वाटांनी पायतळीची पानंफुलं चुरत दूरदूर भटकायचं. निरनिराळ्या अेम्बसींच्या दारांशी घुटमळायचं आणि अंधार होअिस्तो, नि इवल्याइवल्या कारंजाच्या काठांशी पाण्यात पाय सोडून बडबडत चिवचिवत-राहायचं.
 'शंकर'ची 'चौरंगी' वाचल्यावर ती कशी अस्वस्थ झाली होती; पण 'अेपार बांगला, ओपार बांगलांतल्या त्याच्या 'बंगाली' शिष्टपणाचा कसा राग आला हे ती त्याला चिडवत सांगायची. मग तो धमाल भांडायचा. वाँगला देशात त्याचे

६६ /स्वरांत