पान:स्वरांत.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'मीरा आपने आश्वासन दिया था मराठी गाना गानेका याद है ना? गाओना' त्याचा आग्रह.
 'मराठी समझ सकोगे?' ती मिष्किलपणे विचारते.
 'आरी, तू बंगालन बन गयी, मुझे भी तो मराठी समझनेकी कोशिश करनी पडेगी... गाओ. चलो. एक...दो...'
 तीन म्हणायच्या आत सूर उमटतात.
 'रिमझिम पडती श्रावणधारा
    धरतीच्या कलशात
 प्रियाविण उदास वाटे रात...
 आरस्पानी धारा अुंचावरून सांडावी तसा आवाज. नितळ आणि आर्त. कारंजाचे थेंब आणि गारवा अंगागाला झोंबतो. तसेच सूरही. त्याला वाटलं नव्हतं इतकी सुंदर ती गाते. कधीतरी ती थांबते. आपले मिटलेले डोळे तसेच मिटून तो फर्मावतो;
 'और एक! प्लीज...मीरा, और एक...'
 'हिंदी म्हणूऽ' ती विचारते.
 'कुछभी गाओ! गाओ ना!' बस तुम गाओं और मैं सुनता रहूं!
 'ओऽ सजनाऽ..
 बरखाँ बहार आयी ...'
 मन मागेमागे धावतं. महाबळेश्वरची पहिली रात्र. अनंतनं गाणं म्हणण्याचा आग्रह केला होता. त्याचं मांडीवर मस्तक. ती खूपशी भेदरलेली आणि संकोचलेली. थरथरत्या, अस्पष्ट

पहाटनाते /६१