पान:स्वरांत.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठेवून मागे न पाहता ती धावतच पायऱ्या चढते आणि फोनकडे धावते.
 समोर सेमिनारचे सगळे प्रतिनिधी डायनिंगहॉलमध्ये डिनर घेताहेत. समीर तिथून तिला हात करतो. ती पण हसून हात हलवते. रिसेप्शनिस्ट गीताचे गोड हसणं ... ठाकूरदाने दाराशी ठोकलेला सलाम ... तिला आपल्या माणसात आल्यागत वाटतं.
 'हॅलो मोहन देशमुख ? हं मी इन्द्रा. कालच्या प्रवासाने डोकं एकदम चढले बघ. तेव्हा ... सॉरी हं. पुन्हा ? ... छे! छे! ! उद्यापासून सेमिनार सुरू. आता भेटू लातूरलाच...
 ती फोन खाली ठवते आणि गळ्यातलं मंगळसूत्र पदराबाहेर काढीत डौलानं डिनर हॉलच्या पायऱ्या चढू लागते.

* *

५८ /स्वरांत