पान:स्वरांत.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शुद्ध वेजिटेरिअन मधलं म्हागडं जेवण...जवळ जवळ पाचशे रुपयांचा खर्च. फक्त एका संध्याकाळी आणि त्यांच्या बदल्यात?
 हॉटेलवर चलण्याचा आग्रह, दोराहाच्या. सेकंड शोची तिकटे आणि मग ... कदाचित् ? तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरतो. रेशमी फासात अडकलेल्या असहाय हरणीसारखं मन तडफडायला लागतं.
 दृष्टीभर पसरलेली झगमगीत धुंद दिल्ली. वाढती संध्याकाळ. त्याचे लालस नि निर्धास्त डोळे; ऐसपैस वागणं. ती विलक्षण व्याकुळ होते. एकदम सावरते.
 'एवढ सामान घेतलंस. पण ठेवायला बॅग पण नाही'
 केरळा एम्पोरियममधून ते बास्केट खरेदी करतात. टॅक्सीत बसताना ती बास्केट काळजीपूर्वक दोघांच्या मध्ये ठेवते. तो वैतागतो नि ती बास्केट खाली आदळतो. ती खुदकन हंसते नि त्याला सांगते,
 'आत्ताशी ७॥ तर वाजताहेत. मला केंन्द्रावर जाऊ दे. ठीक ९ ला येते मी. रात्रीची परवानगीही काढून येईन.शिवाय मॅचिंग ब्लाउझही घेऊन येते. आहे माझ्याजवळ. ही बॅग राहूदे तुझ्या रूमवर ...' तिच्या लडिवाळ बोलण्याने सुखावतो.
 'ओ के ! ओके !! ' करीत उतरतो.
 केंन्द्रापुढच्या बागेतले नाजूक वळण घेऊन टॅक्सी पोर्चमध्ये उभी राहते. ड्राईव्हरच्या हातावर पाच रुपयाची नोट

वाढत्या सांजवेळे/५७