पान:स्वरांत.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 राजस्थान एम्पोरिअम. घुंगटात संकोचून बसलेल्या आदवशीर भावल्या; रंगीवेरंगी खडे, मणी; काचाच्या नक्षीच्या झगमगत्या चुड्या ! अरीवर्कनी चमचमणारी लाल चुनडी हातांत घेऊन तिथली तरुण विक्रेती अमेरिकन जोडप्याला सांगत असते,
 ... हा लाल रंग प्रीतीच्या बंधनाचा. विवाहाच्या वेळी हीच चुंदडी राजस्थानी वधू पेहेनते. पतिपत्नीचं नातं सदासदैव बांधून ठेवणारी, म्हणून हिचं नाव बंधन चुंदडी. बांधणी.
 गुलबक्षी रंगावर मोहनरंगी पिवळे बुंदके बांधलेली शिनॉन तो तिच्या अंगावर उलगडून टाकतो.
 'इन्द्रा तुला खुलतेय बघ'
 'न खुलायला काय झालं ? मला खरेदी मुळीच करायची नाही. फक्त यशूसाठी आरशांचा कुरता खरेदी करणारेय मी. माझ्या पर्सला परवडायची नाही साडी !'
 'तू कशाला चिंता करतेस? तू फक्त सिलेक्ट कर. बाकी माझ्यावर सोड.' असं म्हणत तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. आणि साडी वांधायला लावतो.
 तिच्या खांद्याला लगटून तो पायऱ्या उतरतो. वाढती संध्याकाळ. दाट होणारा, अस्वस्थ करणारा त्याचा स्पर्श. तुळशीत पुरलेली वेडी स्वप्नं जागी होतील अन् तुळशीचं पान नि पान जाळून जातील. १५० रुपयाची साडी, दहा रुपयाच्या चुड्या, सत्तर रुपायाचे नेपाळी खड्यांचे टॉप्स... एका झटक्यात उमाकांतने तरी एवढा खर्च केला असता का? एका तासात चारशे रुपयांची खरेदी शिवाय टॅक्सी, आइस्क्रीम,

५६ /स्वरांत