पान:स्वरांत.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिला वाटतं त्याला ओरडून सांगावं, ... ' सोड हात ... नको ओढूस ओखटया जाळ्यात. पण शब्द निःशब्द होतात. ती फिरतच राहते. चक्राच्या बरोबर
 चक्र फिरतंय. एकेका फेरीबरोवर गळून पडणारं एकेक ओझं ...
 ... दहा वर्ष कशी नि कुठे गेली कळलंच नाही. करकचून बांधल्यागत जीवन. लग्नानंतर मधुचंद्राला जाण्याचा हट्ट तिचाच. म्हणून तरी महाबळेश्वरला जाता आलं. नंतर माहेरी जाऊन निवांत होणंही कठीण. तो कोर्टकचेऱ्या आणि राजकारणात गुंतलेला. मुंबई-औरंगाबादच्या फेऱ्यात अडकलेला. घरी एकटं बसून कंटाळा येतो म्हणून ती एम. ए. ला बसली. आणि पहिली आली. मग राहूल. त्याच्या पाठोपाठ कुणाल. वर्षांनी लगेच यशोधरा. खरं तर यशू तिच्या मनाविरुद्ध आलेली. यशू चार महिन्यांची असताना कॉलेजात इतिहासाची जागा मोकळी झाली. मग सुरू झालं नोकरीचं रुटीन. फक्त रुटीन.
 पहाटे पाचला उठायचं. खाणं, चहा आटोपून कॉलेजला. पळायचं. बारा वाजता घरी आलं की जेवण. दुपारी वाचन, मग घरातली आवरसावर. शिवाय दिवसाचे दहा तास 'ट्रे सव्हिस'. त्याच्या राजकारणामुळे आणि वकिलीमुळे पाहुण्यांनी सदैव घर भरलेलं. संध्याकाळी जेवण. कधी मधी त्याच्या लहरींना दिलेली निर्जीव उत्तरं. तेही रुटीन.
 भाजी कोणती करायची ? तेल मोहरी संपली का? निमावन्सचं बाळंतपण कुठे करायचं ? असल्या पाणचट

वाढत्या सांजवेळे/४९