पान:स्वरांत.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उद्या बापाविरुद्ध राहणार आहेत उभी ? अरे, ही धमक त्यांच्यात नाही.
 लेट हिम कम ... पण फार विश्वास टाकून, फार कौतुक करू नकोस.
 विजाचं बोलणं त्याला अस्फुट अैकू येत असतं. विजाच्या मघाच्या हसण्याचाही त्याला वीट येतो. तो जायला निघतो.
 घरीही जावंसं वाटत नाही. मनावर ढगळ बुरशीचा दाट थर चढलाय. वाटतं, जगणं म्हणजे एक तुफान ... भंकस ... नं टाळता येणारी.
 दगडी अंधार गळ्यापर्यंत दाटतोय. श्वास घुसमटताहेत. अंधार फोडून आवेगानं बाहेर येण्यासाठी त्यांचं मन तडफडतं. तो मानेला ताण देऊन कडकड हाडं मोडतो नि छाती भरून श्वास घेत झपझप चालू लागतो.
 समोर टेलिफोन बूथ. तो आत शिरतो.
 'हॅलो, मी मिलिंद अरविंद सोनाळकर. पेपर अँड पल्पच्या जनरल मॅनेजरचा मुलगा. माझ्या वडिलांचे आठ बँकांत अकाउंटस् आहेत. नि तीन बँकांत लॉकर्स. दहा दिवसापूर्वी बाबा गोव्याहून आले. येताना खूपशी बिस्किटं आणलीत. ती आता या क्षणी ममीच्या रूममधल्या तळघराच्या चोरकप्प्यात मिळतील. माझ्या बाबांना वडिलार्जित ईस्टेट काहीही नव्हती.'
 तो बाहेर येऊन कपाळावरचा घाम पुसून टाकतो.
 नटराज समोरच्या फूटपाथवरच्या फ्रूटज्यूस सेंटरमधून

४४ /स्वरांत