पान:स्वरांत.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'काय मिलिंद, सुट्टीत शिविराला येणार ? अरे, बघ तर खरे येऊन. नाचणीची भाकरी नि उडदाचं वरण खावं लागेल. मात्र तेही छान लागतं. ' विजय विचारतो.
 आज अरुणाही आलीय.
 ती दोन महिने जाऊन राहणार आहे म्हणे डोंगरकड्याला.
 'काय तुफान नाचतात बाया. टोपले नि सूप असं क्लास नाचवतात ! रात्रभर नाचत होतो आम्ही ढोलाच्या तालावर. अरुणा, विजा नि दिलीपसुद्धा नाचले. रिअली सोमावलहून आल्यापासून मन घरात रमतच नाही. दहादहा कोसावरून चालत येणाऱ्या त्या भिल्ल बाया ... मोर्चात मार खाणाऱ्या बारा तेरा वर्षाच्या पोरी ... येशी नि राशी. दारूचे माठ शोधून फोडणारा आमचा जथ्या.
 केवढा प्रचंड विश्वास वाटतो त्यांना संघटनेबद्दलं.
 'ममी. जाम वैतागते माझ्यावर. पण मला अलीकडे सुंदर साड्या नेसाव्यात, कुणालातरी झुलवावं, भुलवावं असं वाटतच नाही.'
 - संध्या अरुणाला सांगत असते.
 मिलिंद अरुणासंध्याशी गप्पा मारत उभा राहतो. पण त्याचे कान मात्र आहेत गिरिधर नि विजाच्या बोलण्याकडे.
 '... अरे, ही बड्यांची पोरं केवळ फॅशन म्हणून येतात आपल्याकडे. हाही एक प्रतिष्ठा मिळविण्याचा मार्ग म्हणून. रिअली आय हेट देम. त्यांचा पैसा नाकारायचा नाही, पण पैशासाठी त्यांना फार महत्त्वही द्यायचं नाही. अरे, ही पोरं

सांगण्यासारखं काहीच उरलं नाहीये /४३