पान:स्वरांत.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देत नाही? औरच आहेस. तुझ्याच मनाच्या खुळ्या कल्पना. वाढतं वय आहे. या वयात पोरं थोडी घुसमटतातच.'
 'गेट रेडी.'
 'हॅलो मिलिंद. ममीकडून उद्या अठराशेचा चेक घे. बाय व्हाट एव्हर यू लाअीक. १८ वर्षांचा तरुण होणार माझा बच्चा. मिस्टर आम्हाला म्हातारं व्हा म्हणू नका हं....'
 तो काही बोलायच्या आत पाठीवर थाप मारून डॅडी निघून गेलेले.
 'मिलू नॉट फीलिंग वेल ? ' ममी कपाळावर हात ठेवीत जवळ येऊन विचारते.
 'नथिंग ममी. उगाच काळजी करते बुवा तू. आता काय कुक्कुलं बाळ आहे मी? ' तिचा हात अलगद दूर करीत तो म्हणतो. खरं तर त्या क्षणी ममीचा हात घट्ट धरून ठेवावासा वाटतो. ममीचा हात खूप लुसलुशीत आहे. पुरणाच्या पोळीसारखा नि मंदसर उष्णसा.
 'जरा बाहेर जाऊन येतो ग.' असं म्हणत तो पायात चप्पल सरकवतो नि बाहेर येतो.
 रूपालीत कडक कॉफी घेतली की डोक्याचा ठणका थांबेलसं वाटतं. तो रूपालीत शिरतो. तिथं बघावं तेव्हा पोरीपोरांचा थवा लवथवलेला असतो.
 'ए काल पियूला आम्ही जाम पिळलं किनई रेखा ?'
 'साला ती अनिता देख, अरे देख यार जल्दी. दिल थंडा हो जाएगा. काय चालतेय ! मरलिन मन्रो स्वर्गातही जळत असेल रे ... हाऽऽय!'

सांगण्यासारखं काहीच उरलं नाहीये /४१