पान:स्वरांत.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समोरची हिरवळ ... सदा चुस्त तुस्त दिसणारे डॅडी, डॅडी - भोवती नि मिलूराधाभोवती भिरभिरणारी ममी. या सगळ्या गर्दीत आपण एकटे आहोत. सुटेसुटे आहोत ही जाणीव कापीतच राहते.
 " मनोर .. मनोर ... " डॅडी थेट ममीपाशी.
 पूर्वी डॅडी ममीला 'रमी' म्हणायचे. या बंगल्यात आल्यापासून हे नवंच नाव काढलय. 'मनोर' बंगल्याचे नाव तेच. कदाचित नाव आधी नि मग बंगला बांधला असेल. पण साधारणपणे दोनही एकाच वेळच्या गोष्टी.
 तर डॅडी थेट ममीजवळ.
 "यू मस्ट कम् मनोर."
 "मला काही अिंटरेस्ट येत नाही हो त्या ओल्या पार्टीत."
 " बट अदर्स आर अिंटरेस्टेड अिन् यू."
 "छी : ... !! "
 "छी : काय ! रिअली मना. वाटतच नाही तू चाळीशी ओलांडली आहेस हे. आमचा संन्याल तर हिरवा चाफा म्हणतो तुला. यू मस्ट-"
 'प्लीज. अरविंद. आग्रह नको करू.'
 'मिलिंदला आवडत नसावं हे सारं. अलीकडे किती घुमा झालाय. अरू तुम्हीही लक्ष द्यायला हवं त्याच्याकडे. एकोणीसावं लागणार परवा त्याला.'
 ममीचा घुसमटता आवाज.
 'स्टेटसला गेलो केवढे कपडे आणले. जपानहून आणलेली खेळणी तर घरभर साक्षी आहेत नि मी त्याच्याकडे लक्षच

४० /स्वरांत